Tokyo Olympics
Tokyo Olympics Dainik gomantak
क्रीडा

भारताने 12 सुवर्णांसह एकूण 41 पदके जिंकली, आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी

दैनिक गोमन्तक

Asian Youth Para Games : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) आणि पॅरालिम्पिक गेम्सपासून भारतीय खेळाडू (Indian players) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. देश-विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. रिफा सिटी, बहरीन येथे खेळल्या गेलेल्या आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये भारतीय संघाने 12 सुवर्ण, 15 रौप्य आणि 14 कांस्य अशी एकूण 41 पदके जिंकली आहेत. बुधवारी सर्व भारतीय खेळाडू पदकांसह मायदेशी परतणार आहेत.

भारतीय संघाने अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. 22 खेळाडू व्यासपीठावर पोहोचण्यात यशस्वी झाले. यामध्ये आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी 15 पदके जिंकली. यामध्ये टोकियो पॅरालिम्पियन पलक कोहली, संजना कुमारी आणि हार्दिक मक्कर यांनी तीन पदके जिंकली.

भारताने जलतरणात तीन पदके जिंकली. यामध्ये एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. टीम इंडियाला (Team India) पॉवरलिफ्टिंगमध्येही पदक जिंकण्यात यश आले. आशियाई पॅरा युथ गेम्समध्ये 30 देशांतील 700 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान पार पडली.

यादरम्यान युवा पॅरा गेम्समध्ये खेळाडूंनी नऊ खेळांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, बोकिया, गोल बॉल, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा स्विमिंग, पॅरा टेबल टेनिस, पॅरा तायक्वांदो आणि व्हीलचेअर बास्केटबॉल यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT