हिवाळी ऑलिंपिक नेमकं कोणत्या देशात? संभ्रम कायम

अमेरिकेला त्यांच्या चुकीच्या कृत्यांची किंमत मोजावी लागेल.
Olympic
OlympicDainik Gomantak

बीजिंगमधील हिवाळी ऑलिंपिकवर (Olympic) राजनैतिक बहिष्कार टाकण्याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, अशी आगपाखड चीनने (China) अमेरिकेवर (America) केली आहे. दोन राष्ट्रांमधील तणावपूर्ण संबंध कमी करण्याच्या उद्देशाने झालेल्या चर्चेच्या काही आठवड्यांनंतर मंगळवारी दोन्ही राष्ट्रांमधील मतभेद हिवाळी ऑलिंपिकपूर्वी पुन्हा समोर येताना दिसत आहोत. चीनमध्ये मानवी हक्कांच्या होणाऱ्या गळचेपीमुळे अमेरिकी सरकारी अधिकारी हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकतील, परंतु तरी यूएस थलिट्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुक्त आहेत, असे व्हाइट हाऊसकडून सोमवारी जाहीर करण्यात आले.

अमेरिकेचे अध्यक्ष (US President) जो बायडेन आणि चीनचे नेते शी जिनपिंग यांच्यात गेल्या महिन्यांत झालेल्या व्हिडीओ मीटिंगमध्ये दोन्ही देशांमधील संबंध स्थिर करण्याचा प्रयत्न असूनही काँग्रेसच्या काही सदस्यांनी बायडेन सरकारला बहिष्कारासाठी प्रोत्साहित केले असल्याची माहिती आहे.

Olympic
नेसायमध्ये क्रिडा संकुलाला नागरीकांची आडकाठी!

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मंगळवारी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले, की आम्ही या बहिष्काराचा विरोध करतो आणि निश्चित यावर प्रतिकारात्मक उपाय योजले जाण्याचाही पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे अमेरिकेला त्यांच्या चुकीच्या कृत्यांची किंमत मोजावी लागेल.

अमेरिका सध्या लॉस एंजेलिसमध्ये 2028 च्या उन्हाळी ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी सज्ज असून 2030 च्या हिवाळी ऑलिंपिकच्या यजमानपदासाठीही ते बोली लावण्याचा विचार करत आहेत.

चीन आगामी काळात अमेरिकेत आयोजित असणाऱ्या ऑलिंपिक खेळांवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचा विचार करेल का? असे विचारले असता झाओ म्हणाले, की ‘अमेरिकेच्या बहिष्कारामुळे क्रीडा संस्कृतीची जगभरातील देवाणघेवाण धोक्यात आहे. तसेच हा बहिष्कार ऑलिंपिक तत्त्वांच्या विरोधात आहे व अमेरिकेने खेळाला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com