Asian Kabaddi Championship 2023: गतविजेत्या टीम इंडियाने आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारतीय पुरुष संघाने पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 76-13 असा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात तैपेईचा 53-19 असा पराभव केला.
दरम्यान, टीम इंडिया (Team India) 7 विजेतेपदांसह या चॅम्पियनशिपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. यावेळी त्यांच्या पहिल्याच सामन्यात भारताने पहिल्या हाफमध्ये सलग नऊ गुण मिळवत दक्षिण कोरियाला पिछाडीवर टाकले.
टीम इंडियाने पूर्वार्धात 40 गुण मिळवले. ज्यामध्ये कोरियाला केवळ 4 गुणांची कमाई करता आली. उत्तरार्धात दक्षिण कोरियाने पुनरागमन केले, परंतु टीम इंडियाने पुन्हा वर्चस्व राखत 76-13 असा विजय मिळवला.
दुसरीकडे, तैपेईचा 53-19 असा पराभव केला. भारतीय संघाने चायनीज तैपेईविरुद्ध 21-12 अशी आघाडी घेतली. पवन सेहरावतने पहिल्याच चढाईत भारताचे खाते उघडले. या सामन्यात चायनीज तैपेईने भारताला (India) कडवी झुंज देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु टीम इंडियाने त्यांना वर्चस्व गाजवू दिले नाही. शेवटी टीम इंडियाने त्यांचा 53-19 असा पराभव केला.
भारतीय कबड्डी संघाला आता आपला पुढचा सामना 28 जून रोजी जपानविरुद्ध खेळायचा आहे. आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपचे आयोजन 7 वर्षांनंतर होत आहे. टीम इंडियाने 2017 मध्ये पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले होते. यावेळी त्याने गतविजेता म्हणून स्पर्धेत प्रवेश केला आहे.
भारत
इराण
दक्षिण कोरिया
जपान
चायनीज तैपेई
हाँगकाँग
कोरिया प्रजासत्ताकच्या बुसान शहरात खेळल्या जाणाऱ्या या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 30 जुलै रोजी होणार आहे. आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप एकेरी पायी राऊंड रॉबिन स्वरुपात आयोजित केली जात आहे. या अंतर्गत साखळी फेरीनंतर अव्वल दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.