Indian Hockey Team

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Asian Champions Trophy Hockey:भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकले कांस्यपदक

सामन्याच्या सुरुवातीला हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) भारतासाठी पहिला गोल करत भारताला पाकिस्तानविरुद्ध आघाडी मिळवून दिली.

दैनिक गोमन्तक

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकीमध्ये (Asian Champions Trophy Hockey) कांस्यपदक जिंकणाऱ्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. सामन्याच्या सुरुवातीला हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) भारतासाठी पहिला गोल करत भारताला पाकिस्तानविरुद्ध आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी पहिला गोल केला. यानंतर पाकिस्तानच्या (Pakistan) अफराजने पूर्वार्धात गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. खेळाचा पहिला हाफ संपला तेव्हा भारत आणि पाकिस्तान 1-1 ने बरोबरीत होते.

दरम्यान, हाफ टाईमनंतर खेळ सुरु झाला तेव्हा पाकिस्तानने आक्रमक सुरुवात करत तिसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल करत भारताच्या पुढे गेला. पाकिस्तानसाठी अब्दुल राणाने दुसरा गोल केला. परंतु तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पुनरागमन केले, भारताच्या बाजूने सुमितने गोल करत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही.

गतविजेता आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताचा उपांत्य फेरीत जपानच्या संघाकडून 3-5 असा पराभव झाला. भारतीय संघाने राऊंड रॉबिन टप्प्यात अजिंक्य राहून अव्वल स्थान गाठले आहे. 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीचे (Asian Champions Trophy) विजेतेपद भारताने जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT