VIVO Pro Kabaddi: यूपी योद्धाच्या या 7 खेळाडूंना मिळू शकते संधी

यूपी योद्धाचा संघ आज 22 डिसेंबर रोजी गतविजेत्या बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
VIVO Pro Kabaddi: Up Yoddha team

VIVO Pro Kabaddi: Up Yoddha team

Dainik Gomantak

Published on
Updated on

यूपी योद्धा (Up Yoddha) प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) 5 व्या हंगामात प्रथमच सहभागी झाला आणि तेव्हापासून हा संघ सतत प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, तरीही हा संघ विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असून, एकदाही अंतिम फेरीत पोहोचलेला नाही.

यावर्षी, यूपी योद्धाचा संघ आज 22 डिसेंबर रोजी गतविजेत्या बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. पुन्हा एकदा यूपीचा बचाव अधिक मजबूत दिसत आहे. त्यांच्याकडे कॅप्टन नितेश कुमार, सुमित आणि आशु सिंगसारखे बचावपटू आहेत. याशिवाय छापेमारीत त्याने डुबकी राजा प्रदीप नरवाललाही पकडले आहे.

<div class="paragraphs"><p>VIVO Pro Kabaddi:&nbsp;Up Yoddha team</p></div>
मार्गदर्शक बदलताच विजयाला गवसणी, एटीके मोहन बागान संघ विजयी

परदीप नरवाल हा PKL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे आणि यूपी योद्धाला त्याच्याकडून खूप आशा आहेत. पाटणा पायरेट्ससाठी त्याने तीन वेळा विजेतेपद पटकावले असून यावेळी यूपीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

PKL 8 साठी यूपी योद्धाचा संघ खालीलप्रमाणे

परदीप नरवाल, सुरंदिर गिल, श्रीकांत जाधव, रोहित तोमर, साहिल, मोहम्मद तागी, रोहित, जेम्स कामवेती, गुलवीर सिंग, अंकित, अमन हुडा, नितेश कुमार (कर्णधार) , सुमित, आशु सिंग, आशिष नागर, बिंटू नरवाल, शुभम कुमार, गौरव कुमार, गुरदीप आणि नितीन पनवार.

<div class="paragraphs"><p>VIVO Pro Kabaddi:&nbsp;Up Yoddha team</p></div>
क्रिकेटमध्ये गोव्याची शरणागती कायम, छत्तीसगडविरुद्ध फॉलोऑनची नामुष्की

प्रो कबड्डी लीग 8 च्या पहिल्या सामन्यात यूपी योद्धाच्या कोणत्या सात खेळाडूंना संधी मिळू शकते ते पाहूया:

  1. लेफ्ट कॉर्नर - सुमित सांगवान (डिफेंडर)

  2. लेफ्ट इन - श्रीकांत जाधव (रेडर)

  3. लेफ्ट कव्हर - गौरव कुमार (डिफेंडर)

  4. सेंटर - परदीप नरवाल (रेडर)

  5. राइट कवर - आशु सिंग (बचावक)

  6. राइट इन - सुरिंदर गिल (रेडर)

  7. राइट कॉर्नर - नितेश कुमार (कप्तान और डिफेंडर)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com