India vs Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा बांगलादेशशी सामना, काय आहेत पावसाचे अंदाज?

India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश संघात शुक्रवारी आशिया चषकातील सामना रंगणार आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh, Weather Rain Updates:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (15 सप्टेंबर) रंगणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना रंगणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, या सामन्याचा स्पर्धेवर फारसा परिणाम होणार नाही, कारण भारतीय संघाने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे. तसेच बांगलादेश अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

भारताने सुपर फोरमधील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी भारतीय संघ विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल, तर बांगलादेश विजयी शेवट करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत पावसाचा व्यत्यय सातत्याने येताना दिसला आहे. त्यामुळे शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तथापि, भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यावरही पावसाचे सावट आहे. कोलंबोमध्ये शुक्रवारी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा सामन्यावरही परिणाम होऊ शकतो.

Accuweather च्या अंदाजानुसार संध्याकाळच्या वेळेत पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सामन्यात अडथळा येऊ शकतो. पण चाहत्यांना आता अपेक्षा असेल की पावसाचा व्यत्यय आला, तरी सामन्याचा निकाल लागावा.

भारतीय संघात बदलाची शक्यता

या सामन्यासाठी भारतीय संघ बेंच स्ट्रेंथ अजमावू शकतात. भारतीय संघ सातत्याने खेळत असलेल्या काही खेळाडूंना विश्रांती देऊन सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतात.

कुठे पाहाणार सामना?

या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर चाहत्यांना पाहाता येणार आहे. तसेच डिज्नी+हॉटस्टार ऍपवर मोफत हा सामना पाहाता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT