IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यानंतर चाहत्यांमध्येच जुंपली, हाणामारी करतानाचा Video व्हायरल

IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यानंतर चाहत्यांमध्येच जुंपली, हाणामारी करतानाचा Video व्हायरल

Cricket Fans Fight Video: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया चषकातील सामन्यानंतर चाहत्यांमधील धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Asia Cup 2023, India vs Sri Lanka, Cricket Fans Fight Video:

भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक 2023 स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला. कोलंबोमध्ये झालेल्या या सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, हा सामना चांगलाच रोमांचक झाला होता. मात्र या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्याची सध्या चर्चा होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये श्रीलंकेची जर्सी घातलेला एक चाहता स्टेडियमधील इतर चाहत्यांच्या अंगावर धावून गेलेला दिसत आहे. तसेच या भांडणात बाकी चाहतेही नंतर सामील झालेले दिसले.

यादरम्यान चाहत्यांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतरचा असल्याचे अनेक सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यानंतर चाहत्यांमध्येच जुंपली, हाणामारी करतानाचा Video व्हायरल
IND vs SL: प्लेइंग इलेव्हनमध्ये नसूनही चमकला 'सूर्या', श्रीलंकेविरुद्ध विजयात असा उचलला मोठा वाटा

दरम्यान, या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने श्रीलंका संघाला आता अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे किंवा हा सामना रद्द होण्याची आशा बाळगावी लागणार आहे.

जर श्रीलंका अंतिम सामन्यात पोहचले, तर त्यांना सगल दुसऱ्या वर्षी आशिया चषक जिंकण्याची संधी असणार आहे. श्रीलंकेने गेल्यावर्षी अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद जिंकले होते.

मंगळवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५३ धावांची खेळी केली. तसेच इशानने 33 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने 39 धावांची खेळी केली. 

IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यानंतर चाहत्यांमध्येच जुंपली, हाणामारी करतानाचा Video व्हायरल
विराट धावत आला अन् थेट रोहितला दिली 'जादू की झप्पी', IND vs SL सामन्यातील व्हिडिओ व्हायरल

श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागेने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच चरिथ असलंकाने 4 विकेट्स घेतल्या आणि महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 41.3 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागेने सर्वाधिक 42 धावांची नाबाद खेळी केली. तसेत धनंजय डी सिल्वाने 41 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला फार काही करता आले नाही.

भारताकडून कुलदीप व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराद आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com