Asia Cup 2023 | India vs Nepal | Shreyas Iyer and Virat Kohli dropped catches  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: टीम इंडियाची ढिसाळ फिल्डिंग! पहिल्या 5 ओव्हरमध्येच नेपाळच्या सलामीवीरांचे सोडले 3 कॅच

Asia Cup 2023: भारतीय संघाच्या खेळाडूंकडून नेपाळविरुद्ध सुरुवातीलाच ढिसाळ फिल्डिंग पाहायला मिळाली.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Nepal: Shreyas Iyer Virat Kohli Ishan Kishan dropped 3 catches in 5 overs :

आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ संघात सोमवारी सामना होत आहे. कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नेपाळने फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली.

या सामन्यात नेपाळकडून कुशल भुरटेल आणि असिफ शेख यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही नेपाळला चांगली सुरुवात मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना भारतीय संघाच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चूकांमुळे हातभार लागला. भारतीय क्षेत्ररक्षणांनी पहिल्या ५ षटकातच ३ झेल सोडले होते.

मोहम्मद शमी गोलंदाजी करत असलेल्या पहिल्याच षटकात अखेरच्या चेंडूवर कुशल भुरटेलने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत स्लीपच्या क्षेत्रात गेला. तिने पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने उजव्याबाजूला झुकत झेल घेण्याचा प्रयक्न केला. मात्र, त्याच्या हातून चेंडू सुटला आणि भुरटेलला जीवदान मिळाले.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीकडून एक सोपा झेल सुटला. दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी उतरला होता. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर असिफ शेखने सरळ फेटका खेळला, जो काहिसा कव्हर पॉइंटच्या दिशेने गेला. यावेळी विराटने झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडूनही गोंधळ झाल्याने झेल सुटला.

इतकेच नाही, तर मोहम्मद शमीनेच गोलंदाजी केलेल्या ५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरही झेलची संधी होती. भुरटेलने पुलचा शॉट खेळल्यानंतर यष्टीरक्षक इशान किशनकडे झेल घेण्याची संधी होती. पण त्याच्याकडूनही झेल सुटला.

दरम्यान, या जीवदानाचा नेपाळच्या सलामीवीरांनी फायदा घेत चांगली सुरुवात केली. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी केली. पण अखेर १० व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्यांची ६५ धावांची भागीदारी तोडली. त्याने भुरटेलला बाद केले. दरम्यान यावेळी इशानने त्याचा अचूक झेल घेतला. त्यामुळे भुरटेल २५ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला.

तथापि, १० षटकात नेपाळने १ बाद ६५ धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Rohan Harmalkar: जमीन हडप प्रकरण; रोहन हरमलकरची 212.85 कोटींची मालमत्ता 'ED'कडून जप्त

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

SCROLL FOR NEXT