Joe Root Dainik Gomantak
क्रीडा

Ashes Series 2023: जो रुटचा भीम पराक्रम, इंग्लंडसाठी केले 'हे' 2 मोठे रेकॉर्ड!

Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हलवर खेळला जात आहे.

Manish Jadhav

Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात जो रुटने इंग्लंडसाठी शानदार अर्धशतक झळकावले. 52 धावा केल्यानंतर तो फलंदाजी करत आहे.

या अर्धशतकाच्या जोरावर रुटने कसोटी फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी मोठी कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत माजी कर्णधार अॅलिस्टर कुकची बरोबरी केली आहे.

दरम्यान, इंग्लंडकडून (England) माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने 90 अर्धशतके ठोकली आहेत. आता रुटनेही 90 अर्धशतके पूर्ण केली आहेत. इयान बेल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 68 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

चौथ्या क्रमांकावर ग्रॅहम गूचचे नाव आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून हा पराक्रम 66 वेळा केला आहे.

इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक स्कोर करणारे 5 फलंदाज

90 – अॅलिस्टर कूक

90 – जो रुट

68 - इयान बेल

66 - ग्रॅहम गूच

64 - जेफ्री बॉयकॉट

रुटने ऍशेसमध्ये केला हा पराक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पाचव्या कसोटीत अर्धशतक पूर्ण करताच जो रुटने ऍशेसच्या इतिहासातही एक मोठा पराक्रम केला आहे. ऍशेस मालिकेत इंग्लंडसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे.

जॅक हॉब्स या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्याने 27 वेळा हा पराक्रम केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर हर्बर्ट सटक्लिफ आणि तिसऱ्या क्रमांकावर इयान बेल, ज्याने 22 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT