Ashes Series 2023: हॅरी ब्रूकचा मोठा धमाका, इंग्लंडसाठी केवळ 18 कसोटी डावांमध्ये रचला इतिहास

Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात हॅरी ब्रूकने पहिल्या डावात 100 चेंडू खेळून 61 धावा केल्या.
Harry Brook
Harry BrookDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात हॅरी ब्रूकने पहिल्या डावात 100 चेंडू खेळून 61 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर ब्रूकने इतिहास रचला आहे. तो इंग्लंडसाठी 18 कसोटी डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यामध्ये त्याने अँड्र्यू स्ट्रॉसला मागे टाकले आहे.

ब्रूकने 4 शतके आणि 6 अर्धशतक ठोकले आहेत

मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रूक कसोटीत इंग्लंडसाठी (England) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. वयाच्या 24 व्या वर्षी त्याने 18 डावात 64.06 च्या स्ट्राईक रेटने 1089 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, ब्रूकच्या नावावर चार शतके आणि सहा अर्धशतके आहेत.

Harry Brook
Ashes Series 2023: बेन स्टोक्सची झुंज अपयशी! कांगारुंचा शानदार विजय, इंग्लंडचा 43 धावांनी पराभव

18 कसोटी डावांनंतर इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 10 फलंदाज

हॅरी ब्रूक - 1089

अँड्र्यू स्ट्रॉस - 971

अॅलिस्टर कुक - 815

जोनाथन ट्रॉट - 815

केविन पीटरसन - 776

इयान बेल - 689

जो रुट - 682

जॅक क्रॉली - 669

बेन स्टोक्स - 648

पॉल कॉलिंगवुड - 643

Harry Brook
Ashes Series: अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला दुसरा मोठा झटका, 'हा' धाकड गोलंदाज दुखापतग्रस्त

हॅरी ब्रूकची क्रिकेट कारकीर्द

हॅरी ब्रूकची क्रिकेट कारकीर्द अजून लहान आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडसाठी एकूण 34 सामने खेळले आहेत. ब्रूकने 38 डावात 1547 धावा केल्या. ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) 1089, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 86 आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 372 धावा केल्या आहेत. या खेळाडूला इंग्लंडचे भविष्य म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com