Usman Khawaja, Marnus Labuschagne Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: इंग्लिश चाहत्याने 'बोअरिंग' म्हणताच भडकला लॅब्युशेन, ख्वाजानेही दिले प्रत्युत्तर, पाहा Video

Pranali Kodre

Ashes 2023, 5th Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सध्या ऍशेस २०२३ मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचवा सामना द ओव्हल स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघाच विजयासाठी चूरस पाहायला मिळत आहे.

पण यादरम्यान चाहत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पण याच उत्साहाच्या भरात काही वादग्रस्त घटनाही घडलेल्या या मालिकेदरम्यान पाहायला मिळाल्या.

पाचव्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ ड्रेसिंग रुममध्ये जात असताना एका प्रक्षकांने त्यांना कंटाळवाणे असा टोपणा मारला. दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने आक्रमक फलंदाजी केली होती. याच गोष्टीची आठवण करून देताना प्रेक्षकाने ऑस्ट्रेलियन संघाला कंटळवाणे म्हटले होते.

पण, त्यावर ऑस्ट्रेलियाचे मार्नस लॅब्युशेन आणि उस्मान ख्वाजा यांनी त्या प्रेक्षकाला प्रत्युत्तरही दिले. लॅब्युशेन आणि ख्वाजा हे अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह पायऱ्या चढत असताना प्रेक्षकाने त्यांना कंटाळवाणे म्हटल्याचे ऐकून थांबले.

त्यानंतर ख्वाजाने त्या प्रेक्षकाला शांत राहण्यास सांगितले, तर लॅब्युशेन त्याला तुम्ही काय म्हणाला, असे सातत्याने विचारत होता? त्यानंतर त्या प्रेक्षकाने माफी मागितली आणि तो मागे सरकला. त्यानंतर ख्वाजानेही लॅब्युशेनला पुढे नेले.

यापूर्वी, लॉर्ड्स कसोटीवेळीही ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध अपमानजनक कमेंट एमसीसी सदस्यांनी उडवली होती. त्यानंतर तीन एमसीसी सदस्यांना निलंबित केले होते.

सामना रोमांचक वळणावर

पाचव्या सामन्याचा अखेरचा दिवस बाकी आहे. या सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 249 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला 10 विकेट्सची गरज आहे.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 283 धावा केल्या, तसेच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 295 धावा करत 12 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 395 धावा केल्या.

त्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 384 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाखेर बिनबाद 135 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT