Ashes 2023: इंग्लंडच्या खेळाडूंनी एकमेकांची जर्सी का घातली? कारण जाणून तुम्हीही म्हणाल...

Ashes 2023: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत.
England Team
England Team Dainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचा इंग्लिश संघाचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलियाला जवळपास 20 वर्षांपासून इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका जिंकता आलेली नाही. दरम्यान, ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लिश संघाने असे काय केले ज्याला सर्वजण सलाम करत आहेत.

खरे तर, तिसऱ्या दिवशी जेव्हा इंग्लिश संघ फलंदाजीसाठी उतरला, त्याआधी सामन्यापूर्वीच्या लाईनअपमधील प्लेअर्सच्या जर्सीने सर्वांनाच हैराण केले, पण कारण समोर आल्यानंतर सर्वांनीच सलाम केला.

इंग्लंडचे (England) खेळाडू स्वतःच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरले नाहीत. प्रत्येकाने एकमेकांच्या नावाची जर्सी घातली होती.

England Team
Ashes 2023: 'भारताविरुद्धच्या सीरीजपर्यंत...', निवृत्तीबाबत अँडरसन स्पष्टच बोलला

जर्सी जागृतीसाठी परिधान केली

दरम्यान, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा हा प्रयत्न म्हणजे डिमेंशियाचे रुग्ण ज्या संभ्रमातून जातात त्या स्थितीची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी होता. इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि अल्झायमर सोसायटी यांच्या संयुक्त कॉलवर घेतलेल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले.

England Team
Ashes 2023 मध्ये पुन्हा रनआऊटवरून राडा! स्मिथ क्रिजमध्ये येण्याआधी बेअरस्टोने बेल्स उडवले पण...

ऑस्ट्रेलियाला रोखणे सोपे नाही

ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत आधीच 2-1 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत इंग्लंडने 100 वी कसोटी जिंकली तरी मालिका अनिर्णित राहील. मात्र, ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडेच राहील.

इंग्लंडसाठी 100 वी कसोटी जिंकणे सोपे नसले तरी या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. इंग्लंड पहिल्या डावात 283 धावांवर सर्वबाद झाला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला डावही 295 धावांवर आटोपला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com