Nathan Lyon Dainik Gomantak
क्रीडा

Nathan Lyon Video: जिद्द म्हणतात ती हिच! लायननं दाखवलं सिंहाचं हृदय, जखमी पायाने मैदानात उतरला अन्...

Ashes 2023: पायाला दुखापत असतानाही नॅथन लायनने लॉर्ड्स कसोटीत फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतलेला.

Pranali Kodre

Nathan Lyon coming out to bat despite serious calf injury: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस 2023 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असून या सामन्यात ऑस्ट्रलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनच्या जिद्दीचे दर्शन अनेक चाहत्यांना घडले.

खरंतर हा सामना खेळताना पहिल्याच डावात लायन दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या पोटरीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो कदाचीत संपूर्ण ऍशेस मालिकेतूनच बाहेर होण्याची शक्यता आहे. असे असतानाही तो शनिवारी (1 जुलै) ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.

या सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 264 धावांवर नववी विकेट गमावली होती. त्यानंतर लायन मैदानात फलंदाजीसाठी उतरला. त्याला फलंदाजीला आलेले पाहून सर्वचजण चकीत होते. कारण त्याला चालताही येत नव्हते. पण तरी तो मैदानात उतरला होता.

विशेष म्हणजे त्याने अखेरच्या विकेटसाठी मिचेल स्टार्कबरोबर 15 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. त्याने 13 चेंडूंचा सामना करताना 4 धावा केल्या. अखेर तो स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सकडे झेल देत बाद झाला. पण त्याचे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून कौतुक करण्यात आले.

तसेच प्रेक्षकांनीही त्याच्या जिद्दीला उभे राहुन टाळ्या वाजवत दाद दिली. त्याने स्टार्कबरोबर केलेल्या 15 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 279 धावा करता आल्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 91 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान, दुखापत असताना मैदानात उतरण्याचा निर्णय हा लायनचाच होता, असे त्यानेच शनिवारच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्पष्ट केले. त्याने सांगितले की 'जेव्हापासून ही दुखापत झाली, तेव्हापासून मी सातत्याने आमच्या मेडिकल टीमच्या संपर्कात आहे. मला जोखीम माहित आहे, पण मी या संघासाठी काहीही करायला तयार आहे.'

तुम्हाला माहित नाही की 15 धावांची भागीदारीही ऍशेस मालिकेत किती महत्त्वाची ठरू शकेल. मला माझ्या स्वत:चा अभिमान आहे की मी मैदानात गेलो आणि खेळलो. माझे या संघावर प्रेम आहे. मला ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळायला आवडते आणि जर मी माझ्या संघसहकाऱ्यांना काहीही मदत करू शकत असेल, तर मी ती करेल.
नॅथन लायन, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू

लायन पुढे म्हणाला, 'हा माझा निर्णय होता. मी प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांच्याशी आणि पॅट कमिन्सशी बोललो. पॅट थोडा संकोच करत होता, पण मी या संघासाठी काहीही करेल आणि उद्याही मी गरज लागली तरी काहीही करेल.'

तसेच या दुखापतीमुळे खुप वाईट वाटल्याचे त्याने सांगितले. इंग्लंडमध्ये ऍशेस जिंकणे हे स्वप्न असल्याचेही त्याने सांगितले. लायनला या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी झेल घेण्याच्या प्रयत्नात असताना दुखापत झाली. त्याच्या पोटरीतील स्नायू दुखावले गेले आहेत. त्यामुळे तो नंतर गोलंदाजीही करू शकला नाही.

सलग 100 वा कसोटी

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हा लायनचा ऑस्ट्रेलियासाठी सलग 100 वा सामना होता. हा त्याचा तसा कसोटी कारकिर्दीतील 122 वा कसोटी सामना होता, पण गेले 100 सामने तो सलग खेळला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या गेल्या सर्व 100 सामन्यात तो खेळला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सलग 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो सहावा खेळाडू ठरला.

लायन अखेरच्या वेळी 2013 मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्याला मुकला होता. त्यानंतर 1 ऑगस्ट 2013 पासून तो ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या एकाही सामन्याला मुकला नाही. पण आता सलग 100 कसोटी सामने खेळल्यानंतर मात्र त्याला कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. कारण तो तिसरा ऍशेस कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.

सामना रोमांचक वळणावर

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 371 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाखेर 31 षटकात 4 बाद 114 धावा केल्या आहेत. त्यामुळे रविवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी विजयासाठी इंग्लंडला 257 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सची गरज आहे.

तत्पूर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात 76.2 षटकात सर्वबाद 325 धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT