Arshdeep Singh, Umran Malik Dainik Gomantak
क्रीडा

IND v NZ, 1st ODI: इंडियाकडून वनडे पदार्पण केलेल्या अर्शदीप-उमरानची कशी आहे आजपर्यंतची कामगिरी?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेतून शुक्रवारी भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी वनडे पदार्पण केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

IND v NZ, 1st ODI: न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यामुळे या दोघांचेही वनडे पदार्पण झाले आहे.

अर्शदीप आणि उमरान हे वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनुक्रमे 248 आणि 249 वे खेळाडू ठरले आहेत. यापूर्वी या दोघांचेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले आहे. आता त्यांनी वनडे संघातही जागा मिळवली आहे.

अर्शदीपला कर्णधार शिखर धवनने आणि उमरानला गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी पदार्पणाची कॅप बहाल केली.

अर्शदीपची कामगिरी

अर्शदीपने (Arshdeep Singh) आत्तापर्यंत 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने खेळलेल्या 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 18.12 च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अर्शदीपने 6 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 21 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये 17 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याने आजपर्यंत खेळलेल्या एकूण 72 टी20 सामन्यांमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत.

उमरान मलिकची कामगिरी

जून 2022 मध्ये आर्यंलडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या उमरान मलिकने (Umran Malik) आत्तापर्यंत 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 6 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 11 विकेट्स आपल्या नाववर केल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या उमरानने कारकिर्दीत 3 लिस्ट ए सामनेही खेळले असून त्यात त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 33 टी20 सामन्यांमध्ये 45 विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताचा अंतिम 11 जणांचा संघ -

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT