India vs New Zealand: वनडेत भारत-न्यूझीलंड संघापैकी कोण ठरलंय वरचढ, पाहा रेकॉर्ड्स

भारत आणि न्यूझीलंड संघात 25 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.
Arshdeep Singh | India vs New Zealand
Arshdeep Singh | India vs New ZealandDainik Gomantak
Published on
Updated on

India vs New Zealand: न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात 25 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना इडन पार्क, ऑकलंड येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:00 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची आजपर्यंतची वनडेत कशी कामगिरी राहिली आहे, यावर एक नजर टाकू.

आमने सामने कामगिरी

भारत आणि न्यूझीलंड संघ (India vs New Zealand) आजपर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 110 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यातील 55 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तसेच 49 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. त्याचबरोबर 1 सामना बरोबरीत झाला असून 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

Arshdeep Singh | India vs New Zealand
NZ vs IND 1st ODI, Live Streaming: केव्हा अन् कुठे होणार पहिली वनडे, घ्या जाणून

तसेच भारताने न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या 42 वनडे सामन्यांचा विचार केल्यास 14 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 1 सामना बरोबरीत सुटला असून 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

तसेच ऑकलंडला झालेल्या 9 वनडे सामन्यांपैकी 3 सामनेच जिंकण्यात भारताला (Team India) यश आले आहे, तर 5 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.

शेवटच्या मालिकेत व्हाईटवॉश

यापूर्वी भारताने न्यूझीलंडविरुद्ध 2020 मध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. ही मालिका न्यूझीलंडमध्येच झाली होती. पण, त्या मालिकेत न्यूझीलंडने 3-0 अशा फरकाने विजय मिळवत भारताला व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे यंदा मात्र, भारतीय संघ वनडे मालिकेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षेने मैदानात उतरेल.

दरम्यान, आता पुढीलवर्षी वनडे वर्ल्डकप होणार असल्याने यापुढील वनडे मालिका त्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com