Team India Viral Video: टीम इंडियाचा स्वॅग, न्यूझीलंडच्या बीचवरील खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल

नुकत्याच पार पडेलेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला.
Team India Viral Video
Team India Viral VideoDainik Gomantak

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी20 आणि मग तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. 18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेसाठी संघाची जबाबदारी हार्दिक पांड्या तर, एकदिवसीय संघाची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, सामन्यांपूर्वी भारतीय खेळाडूंचा न्यूझीलंडच्या बीचवर मजा-मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Team India Viral Video
Indian Arrested In Nepal: नेपाळ निवडणुकीपूर्वी एका भारतीयाला अटक, कारण आहे धक्कादायक

नुकत्याच पार पडेलेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर पहिल्याच दौरा करणारा भारतीय संघ चांगल्या मूडमध्ये दिसत आहे. बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे काही खेळाडू समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कर्णधार हार्दिक, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंह, उमरान मलिक दिसत आहेत.

Team India Viral Video
Global Plastic Convention In Goa: गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचा शुभारंभ; 250 उद्योगसमूहांचा सहभाग

T20 And ODI Schedule :

उभय संघातील टी20 मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर, दुसरा टी-20 सामन 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

तसेच, पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर रोजी होणार असून, दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर आणि तिसरा सामना 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Team India Viral Video
Iffi Goa: इफ्फीकडून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा गौरव; दाखवले जाणार तीन जुने चित्रपट

T20 मालिकेसाठी भारतीय संघ (T20 Team)

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ (ODI Team)

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com