ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांदरम्यान पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात इतिहास रचला. ॲनाबेल सदरलँडने शानदार द्विशतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक केल्यानंतर ॲनाबेल सदरलँडने महिला कसोटीच्या इतिहासात सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रमही केला.
दरम्यान, लंच ब्रेकनंतर सदरलँडने 113 धावांवरुन पुन्हा सुरुवात केली आणि थकलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा तिने चांगलाच समाचार घेतला. ड्रिंक्स ब्रेकनंतर लगेच ती 150 धावांच्या पार गेली. 22 वर्षीय व्हिक्टोरियनला कोणीही रोखू शकले नाही आणि 200 चा टप्पा पार करण्यात ती यशस्वी ठरली. तिने 248 चेंडूत तिचे द्विशतक पूर्ण केले, जे महिलांच्या कसोटी क्रिकेटमधील (Test cricket) सर्वात जलद द्विशतक आहे.
दुसरीकडे, सदरलँडच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) कॅरेन रोल्टनच्या नावावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा रेकॉर्ड होता. तिने 2001 मध्ये इंग्लंडविरुद्ध 306 चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. या प्रक्रियेत ॲनाबेल सदरलँड ही द्विशतक झळकावणारी सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन महिला ठरली. सदरलँडने या सामन्यात 210 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली.
त्याचबरोबर, अष्टपैलू ॲनाबेल सदरलँड ही कसोटीत द्विशतक झळकावणारी जगातील नववी महिला ठरली, तर ऑस्ट्रेलियासाठी हा टप्पा गाठणारी दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. 200 धावा करणारी एकमेव युवा खेळाडू भारताची माजी कर्णधार मिताली राज होती, तिने वयाच्या 19 व्या वर्षी 214 धावा केल्या होत्या. सदरलँड याआधी सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखालील फलंदाजी करताना दोन शतके झळकावणारी पहिली महिला ठरली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.