Yashasvi Jaiswal - Anil Kumble X
क्रीडा

Yashasvi Jaiswal: 'जा जाऊन कर्णधाराला सांग...', दोन द्विशतक करणाऱ्या जयस्वालला अनिल कुंबळेचा खास सल्ला

Anil Kumble: भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने जयस्वालला खास सल्ला दिला असून रोहितकडे एका गोष्टीसाठी हट्ट करण्यासही सांगितले.

Pranali Kodre

Anil Kumble advice to Yashasvi Jaiswal:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेत तीन सामन्यातच दोन द्विशतकांसह 545 धावा फटकावल्या आहेत.

दरम्यान, फलंदाज म्हणून जयस्वाल शानदार कामगिरी करत असला, तरी त्याच्याकडे लेग स्पिन गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, याची आठवण अनिल कुंबळेने करुन दिली आहे.

भारताने राजकोटला झालेल्या या कसोटी मालिकेतील तिसरा सामन्यात 434 धावांनी विजय मिळवल्यानंतर जयस्वालशी बोलताना कुंबळेने त्याच्या गोलंदाजीबद्दल त्याच्याशी चर्चा करताना एक गमतीशीर सल्लाही दिला.

राजकोट कसोटीत 214 धावांची नाबाद खेळी करणारा जयस्वाल सामन्यानंतर जिओ सिनेमाच्या शोमध्ये अनिल कुंबळेबरोबर बोलत होता.

यावेळी कुंबळे त्याला म्हणाला, 'चांगली फलंदाजी केली. पण एक गोष्ट आहे, जी मी पाहिली आहे आणि मला वाटतं ती तू कायम केली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे तुझ्याकडे नैसर्गिक लेग स्पिन आहे. त्यामुळे तो ते सोडू नको. कारण तुला ते कधी फायदेशीर ठरेल, हे सांगता येणार नाही.'

'मला माहित आहे तुझ्या पाठीमध्ये वेदना होत आहेत, पण तू त्यावर खूप काम केले आहे. जा आणि तुझ्या कर्णधाराला सांग तुला काही षटके गोलंदाजी द्यायला.'

त्यावर जयस्वाल म्हणाला, 'मी नेहमीच जाऊन गोलंदाजी करतो. त्याने (रोहितने) मला सांगितले आहे की त्यासाठी तयार रहा आणि मी पण त्याला सांगितले आहे की मी गोलंदाजीसाठी तयार आहे.'

दरम्यान, अनेकांना माहित नसेल पण जयस्वालकडे गोलंदाजीचीही क्षमता असून त्याने अनेकदा चांगली गोलंदाजीही केली आहे. 2020 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये जयस्वालने 400 धावा करण्याबरोबरच 6 सामन्यात 3 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच त्याने आत्तापर्यंत लिस्ट ए क्रिकेटमध्येही 7 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT