Anil Kumble Birthday Dainik Gomantak
क्रीडा

Anil Kumble Birthday: फिरकीच्या बादशाहला चाहत्यांचा 'सलाम', World Cup मधील हे रेकॉर्ड पाहून तुम्हीही म्हणाल...

Anil Kumble Birthday: फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Manish Jadhav

Anil Kumble Birthday: फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 रोजी बंगळुरु येथे झाला. तो टीम इंडियासाठी एक मॅचविनर होता.

त्याने स्वतःच्या बळावर भारतासाठी अनेक सामने जिंकले. विश्वचषकात त्याचा विक्रमही अनोखा ठरला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कुंबळे 4 वनडे वर्ल्ड कप सीझनमध्ये भारतीय संघाचा भाग होता.

चला तर मग त्याच्या वाढदिवसानिमित्त अशा काही विक्रमांबद्दल जाणून घेऊया, जे मोडणे कुणालाही कठीण जाईल.

1999 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या

माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेने (Anil Kumble) आपल्या करिष्माई गोलंदाजीने भल्याभल्यांना गारद केले. कुंबळेने पहिला विश्वचषक 1996 मध्ये खेळला होता. या मोसमात तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.

यानंतर 1999 च्या विश्वचषकात त्याचा विक्रमही उत्कृष्ट होता. त्यानंतर 2003 मध्येही कुंबळे विश्वचषक संघाचा भाग होता. जरी तो 2003 मध्ये केवळ 3 विश्वचषक सामने खेळला.

कुंबळे पुढच्या हंगामात म्हणजे 2007 च्या विश्वचषकात एक सामना खेळला होता. अशाप्रकारे, कुंबळेने 4 विश्वचषक हंगामात एकूण 18 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि 31 बळी घेतले.

विश्वचषक (World Cup) स्पर्धेत अनिल कुंबळेने 22.83 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 32 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने गोलंदाजीत फार कमी धावाही दिल्या आहेत. कुंबळेने केवळ 4.08 इकॉनॉमीसह धावा दिल्या.

गोलंदाजीशिवाय त्याने 14 झेलही घेतले आणि फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या चमकदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहते त्याचे योगदान कधीच विसरणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT