Cameron Green Dainik Gomantak
क्रीडा

Cameron Green Catch: WTC फायनलनंतर ग्रीनने ऍशेसमध्येही पकडला 'लो कॅच', अंपायरने काय निर्णय दिला पाहा

Video: कसोटी चॅम्पिनयनशीप फायनलनंतर पुन्हा एकदा ग्रीनने पहिल्या ऍशेस सामन्यातही जमिनीलगतचा घेतलेला झेल चर्चेत आहे.

Pranali Kodre

Cameron Green Low Catch in 1st Ashes Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेचा पहिला सामना बर्मिंगघमला 16 जूनपासून सुरू झाला आहे. या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच चूरस रंगली असतानाच कॅमेरॉनने ग्रीनने घेतलेला एक झेल पुन्हा चर्चेत आला आहे.

झाले असे की पहिल्या ऍशेस सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा सातत्याने अडथळा आला होता. पण या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 386 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

यावेळी 9 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या ऑफसाईड ऑफ चेंडूवर बेन डकेटने शॉट खेळला. पण त्याला फार लांब तो शॉट मारता आला नाही आणि त्यामुळे चेंडू गलीमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनने हा शानदार झेल घेतला.

ग्रीनने डावीकडे सूर मारत चेंडू अगदी जमीनीपासून काही सेंटीमीटरच वर असताना झेल घेतला. त्यामुळे पंचांनी डकेटला बाद दिले. डकेट 28 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. ग्रीनच्या या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या या झेलाचे कौतुकही होत आ

काही दिवसांपूर्वी ग्रीनचा झेल ठरलेला वादग्रस्त

जूनच्या सुरुवातीला द ओव्हलवर कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिलचा दुसऱ्या डावात ग्रीनने गलीच्या क्षेत्रातच झेल घेतलेला, त्यावेळीही त्याने चेंडू खूप खाली आला असताना झेल घेतला होता.

त्यामुळे चेंडूचा जमीनीला स्पर्श झाला आहे की नाही, हे अनेक रिप्लेमध्ये तपासल्यानंतर तिसऱ्या पंचांनी गिलला बादचा निर्णय दिला होता. पण यावरून अनेक चर्चा झाल्या होत्या. अनेकांनी तिसऱ्या पंचांचा निर्णय चूकीचा असल्याचे म्हटले होते. पण नंतर पंचांच्या निर्णयाबाबत आयसीसीने याबाबत स्पष्टीकरणही दिले होते.

पहिला ऍशेस सामना निर्णयक वळणावर

पहिल्या ऍशेस सामन्यात इंग्लंडने पहिला डाव पहिल्याच दिवशी 78 षटकांनंतर 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 116.1 षटकात सर्वबा 386 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 28 धावा केल्या असून पहिल्या डावातील ७ धावांच्या आघाडीमुळे इंग्लंड 35 धावांनी पुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT