Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 साठी अफगाणिस्तान पात्र, भारतात खेळवली जाणार ICC स्पर्धा

दैनिक गोमन्तक

ODI World Cup 2023: श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आपले स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत त्यांच्या खात्यात आणखी पाच गुणांची भर घातली.

अफगाणिस्तानला 2023 च्या विश्वचषकात प्रवेश मिळाला

सध्याच्या टेबलमध्ये अफगाणिस्तान (Afghanistan) सातव्या स्थानावर आहे. सुपर लीगच्या शेवटी अव्वल आठ संघांना वन डे चषकात थेट प्रवेश मिळेल. जिथे अफगाणिस्तानला पाच गुणांचा फायदा झाला. त्याचवेळी हा निकाल श्रीलंकेसाठी अनुकूल नव्हता. आता थेट पात्र होण्याची त्यांची आशा मावळली आहे.

श्रीलंका सर्व 10 गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल

श्रीलंकेचे (Sri Lanka) केवळ 67 गुण आहेत. गुणतालिकेत श्रीलंका दहाव्या स्थानावर आहे. त्याला अजून चार सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये तो जास्तीत जास्त गुण मिळवून पहिल्या आठमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये बुधवारी पल्लीकल येथे होणार्‍या अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या वनडेचा समावेश आहे, ज्यामध्ये श्रीलंका सर्व 10 गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात विजयाची नोंद करुन त्याला तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधायची आहे.

ही मेगा आयसीसी स्पर्धा भारतात खेळवली जाणार

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ 42.2 षटकात 228 धावांवर गारद झाला, त्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघाने 2.4 षटकात 10 धावा केल्या होत्या, जेव्हा पाऊस पडला आणि सामना रद्द करावा लागला. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा एकदिवसीय सामना पावसामुळे वाहून गेला, परंतु तरीही अफगाणिस्तान पुढील वर्षी भारतीय भूमीवर होणाऱ्या 2023 विश्वचषकासाठी पात्र ठरला. 2023 चा विश्वचषक पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT