Badminton National Games Goa 2023  Dainik Gomantak
क्रीडा

National Games Goa 2023: 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: गोव्याचे बॅडमिंटनपटू लढले, पण विजयास मुकले

बॅडमिंटन स्पर्धेला ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली.

दैनिक गोमन्तक

यजमान गोव्याच्या बॅडमिंटनपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी लढाऊवृत्ती प्रदर्शित केली, पण विजयाला मुकले. त्यांच्यावर महिला विभागात पंजाबने ३-१ अशा, तर पुरुष गटात महाराष्ट्रानेही याच फरकाने विजय मिळविला.

बॅडमिंटन स्पर्धेला ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली.

महिलांच्या ब गटात साक्षी कुरभेळगी हिने पंजाबच्या समृद्धीवर २१-१६, २१-१८ असा तीस मिनिटांत विजय मिळवून गोव्याला स्वप्नवत सुरवात करून दिली. त्यानंतर गोव्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुरा प्रभुदेसाई हिने जोशपूर्ण खेळ करताना एक तास पाच मिनिटे किल्ला लढविला.

मात्र अखेरीस तिला राधिका शर्मा हिच्याकडून २१-१६, १७-२१, २१-१८ अशी माघार घ्यावी लागली. पुरेशा विश्रांतीअभावी लगेच लिडिया बार्रेटो हिच्यासह दुहेरीत अनुरा हिला खेळावे लागले.

गोव्याच्या जोडीला मान्या रहलन व राधिका शर्मा जोडीने ३७ मिनिटांत २१-१८, २१-९ असे हरवून पंजाबला आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत अंजना कुमारी जायबंदी झाल्यामुळे गोव्याला धक्का बसला.

मान्या रहलन हिच्याविरुद्ध १४-१४ अशी बरोबरी असताना अंजना जायबंदी झाली, तरीही जिद्दीने ती खेळली, मात्र शेवटी १४-२० अशी पिछाडीवर असताना तिला सामना सोडावा लागला.

पुरुषांच्या अ गटात महाराष्ट्राच्या रोहन गुरबानी याने गोव्याच्या अयान शेख याला २१-१०, २१-९ असे हरविले, मात्र नंतर अरुणेश एच याने आर्य भिवपाठकी याला २१-१८, २१-१३ असे नमवून गोव्याला बरोबरी साधून दिली.

नंतर दुहेरीत दीप रंभिया व अक्षण शेट्टी जोडीने गोव्याच्या अर्जुन फळारी व महंमद रेहान जोडीला २१-१६, २१-१४ असे नमविल्यानंतर दर्शन पुजारी याने राहुल देसवाल याला २१-१५, २१-१४ असे नमवून महाराष्ट्राच्या सलग दुसऱ्या विजयावर, तसेच उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

पुरुषांच्या ब गटात कर्नाटकने उत्तराखंडला ४-१ व दिल्लीस २-१ असे हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या अ गटात पश्चिम बंगालला दोन्ही लढती गमवाव्या लागल्या. त्यांना आसाम व आंध्र प्रदेशने प्रत्येकी ३-० फरकाने हरविले. ब गटात महाराष्ट्राने पंजाबला २-० असे पराजित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT