Goan Artist:'धर्मवीर'मध्ये राज ठाकरे साकारलेला 'गोमंतकीय' कलाकार; अनुज प्रभू

एक दिवस अचानक आलेल्या फोनमुळे अनुज च्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. तो फोन होता कास्टिंग डायरेक्टर निरंजन जाविर यांचा.
Anuj Prabhu
Anuj PrabhuDainik Gomantak
Published on
Updated on

गोमंतभूमीत वेगवेगळे कलाकार जन्माला आले. वर्षा उसगावकर, भूमी पेडणेकर, गिरिजा प्रभू सारख्या बऱ्याच कलाकारांनी गोव्याचे नाव कला क्षेत्रात एका उंचीवर नेऊन ठेवले. या नावामध्ये आता अजून एका गोमंतकीय तरुणाचे नाव जोडले गेले आहे.

अनुज हरी प्रभू हा मांद्रे गावातील तरुण सध्या कामानिमित्त मुंबईत असतो. अनुज चा जन्म गोव्यातलाच. वडील स्टेट बँक ऑफ इंडिया मधून रिटायर्ड ऑफिसर आणि आई मांद्रे हायस्कूल मध्ये शिक्षिका. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला अनुज लहानपणापासूनच हरहुन्नरी कलाकार आहे.

Drama scene
Drama scene Dainik Gomantak

गोवा अभियांत्रिकी विध्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये इंजिनीअरिंग केलेला अनुज लहान असल्यापासूनच हुशार. त्यामुळे शाळेत प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असायचा. त्याचे प्राथमिक शिक्षण मांद्रे गावातील मांद्रे हायस्कूल झाले आहे.

बालपणापासून कलेची आवड असल्याने शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये नृत्यात सहभागी व्हायचा. इयत्ता चवथी मध्ये असताना त्याची शिक्षिका सुनीता गोवेकर यांनी कोंकणी नाटकात त्याला पहिल्यांदा संधी दिली आणि इयत्ता पाचवी मध्ये एका इंग्रजी नाटकात उत्कृष्ट नट पारितोषिक मिळाल्यावर त्याचा अभिनयाच्या प्रवासाला सुरवात झाली.

Anuj Prabhu
विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्‍यांना तणावमुक्त करणे काळाची गरज : प्रा. डॉ. मनस्वी कामत

पुढच्याच वर्षी ‘मत्स्यगंधा’ ह्या संगीत नाटकात केलेली ‘पराशरा’ ची भूमिका लोकांना एवढी आवडली की त्यांनी थेट सार्वजनिक गणेशोत्सवात हे नाटक करण्याची संधी दिली. त्यानंतर बाल भवन केंद्राचे प्रमुख सोमनाथ पार्सेकर यांच्या ‘संगीत स्वयंवर’ मध्ये अनुज ला भूमिका मिळाली.

शाळेत जाण्याचे वय असल्याने या नाटकांच्या प्रयोगाला जाण्यासाठी अनुमति द्यायला अनुज चे पालक तयार नव्हते. पण त्याची कलेची आवड बघून नाटकामुळे शाळा बुडवायची नाही या एका अटीवर ते राजी झाले. यावेळी पहिल्यांदा त्याला अनुभवी कालाकारांसोबत व्यावसायिक रंगमंच अनुभवायला मिळाला.

दहावी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यामुळे उच्चमाध्यमिक ची २ वर्षे अनुज ने कुठल्याच मंचावर अभिनय केला नाही. बारावी नंतर फर्मगुढी येथे गोवा अभियांत्रिकी विध्यापीठात इंजिनीअरिंग ला त्याने प्रवेश घेतला.

Drama scene
Drama scene Dainik Gomantak

इंजिनीअरिंग च्या तिसऱ्या वर्षात असताना परत एकदा अभिनयाची संधी त्याला प्राप्त झाली. कॉलेज मधील सिनीयर्स नाटक बसवताहेत हे कळाल्यावर त्याने आपली सहभाग घेण्याची इच्छा वर्तविली आणि पथनाट्यात त्याला भाग घ्यायला मिळाला.

त्याच्या अभिनय बघून आदित्य जांभळे या सिनीयर ने त्याला विध्यापीठाच्या 'ड्रामा क्लब' मध्ये येण्यास सांगितले. अभिनयाची मुळातच आवड असल्याने अनुज ने ही संधी अजिबात सोडली नाही आणि लगेच त्याने होकार काळविला.

पुण्यात नाट्यस्पर्धेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सकाळ करंडक’ मध्ये ह्या क्लब तर्फे ‘अरे माणसा माणसा’ नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आणि तेव्हा अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याचे त्याने निश्चित केले.

Anuj Prabhu
Vidya Samiksha Kendra: राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर नजर : मुख्यमंत्री

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना संपूर्ण भारतात एकांकिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईमधील 'सकाळ करंडक' स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि गोव्यापेक्षा महाराष्ट्रात असलेले नाटकांचे वेड त्याचा लक्षात आले. आता मुंबई गाठायची हे मनात ठरवूनच तो गोव्यात परतला.

अनुजने आपला निर्णय घरी सांगितल्यावर पहिल्यांदा खूप विरोध झाला. तुझ्या इंजीनीरिंग च्या शिक्षणाचे काय? गोव्यात चांगली नोकरी मिळेल. असे सगळे प्रश्न कुटुंबाने उपस्थित केले पण आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या अनुज ने मुंबई जाण्याचे निश्चित केले होते.

जर तू ह्या क्षेत्रात करियर करणार असेल तर त्याचे व्यवस्थित शिक्षण घे ह्या अटीवर त्याने मुंबईची परवानगी मिळविली. मुंबईतील अकादमी ऑफ थिएटर आर्ट मध्ये अनुज ने प्रवेश घेतला आणि दोन वर्षांनी २०१७ साली मास्टर्स इन ड्रामा हे शिक्षण पूर्ण केले.

अभिनयाचे शिक्षण घेत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे, नदिरा झहीर बब्बर, कुमार सोहनी सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. या दरम्यान या दिग्दर्शकांच्या नाटकांचे प्रयोग देखील कलकत्ता, दिल्ली, इंदौर सारख्या शहरांमध्ये त्यांनी केले.

२०१७ मध्ये मास्टर्स पूर्ण केल्यावर मोठा प्रश्न होता तो राहण्याचा. अकादमीमध्ये हॉस्टेल ची सोय असल्याने शिक्षण तिथेच राहून पूर्ण केल. मास्टर्स पूर्ण झाल्यावर राहायची सोय होत नाही म्हणून अनुज च्या वडिलांनी नायगाव येथे एक फ्लॅट घेतला.

मुंबईत प्रत्येक जागी जाऊन दिवसभर ऑडिशन देणे चालूच होते. पण नाट्याक्षेत्रातून आलेल्या अनुजला काहीतरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. मुंबईत नाटकांना म्हणावा तासा प्रतिसाद मिळत नसल्याने मग पुणे-मुंबई वाऱ्या त्याने सुरू झाल्या.

‘फोर्थ वॉल एंटरटेंमेंट’ ग्रुपतर्फे विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड सारख्या दिग्गज लेखकांची जुनी नाटके नव्या स्वरूपात लोकांसमोर आणली. त्यांचा ‘बंबई’ या हिन्दी नाटकाला महाराष्ट्र राज्य सरकार नाट्यस्पर्धेत दुसरे बक्षीस प्राप्त झाले.

हे सर्व चालू असतानाच कलर्स मराठी चॅनलवर ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेत छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर झी युवा चॅनलवरच्या ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकेत देखील अनुज ने काम केले आहे. ‘सिर्फ एक’ नावाची शॉर्टफिल्म MX PLAYER साठी करण्याची संधी त्याला मिळाली.

एक दिवस अचानक आलेल्या फोनमुळे अनुज च्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. तो फोन होता कास्टिंग डायरेक्टर निरंजन जाविर यांचा. ‘धर्मवीर’ चित्रपटात राज ठाकरे यांच्या भूमिकेसाठी अनुजची निवड करण्यात आली आणि त्याला ठाण्याला बोलावले गेले.

महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकप्रिय नेत्याची भूमिका करण्याचे दडपण तर होते पण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्याच्यावर विश्वास दाखविला. अनुजच्या ‘धर्मवीर’ चिटपटतील भूमिकेची खूप चर्चा झाली. हल्लीच त्याने नंदू माधव याच्यासोबत ‘ताली’ या वेब सिरीज मध्ये छोटी भूमिका केली आहे.

भविष्यात त्याचा ‘जगून घे जरा’ हा मराठी चित्रपट लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर येत आहे तर एका मल्याळम चित्रपटच्या हिन्दी रीमेक मध्ये असलेल्या सहा प्रमुख भूमिकांपैकी एक प्रमुख भूमिका अनुज साकारतो आहे.

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राजू हिराणी अशा दिग्गज आणि अनुभवी लोकांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न आहे. प्रत्येक भूमिका मी तेवढ्याच आवडीने करतो कारण एक कलाकार म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयार राहावे लागते. हल्लीच्या सोशल मिडियावर मिळणाऱ्या २ मिनिटांच्या फेम ला जास्ती महत्व दिले जाते. पण ह्या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना मी एकच सांगू इच्छितो की स्वतःवर विश्वास आणि सहनशीलता ठेवा. रोज प्रयत्न चालू ठेवा एकदिवस यश नक्कीच मिळेल.

अनुज प्रभू, अभिनेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com