Boxing
Boxing  Dainik Gomantak
क्रीडा

36 National Tournament: गोव्याचे बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित

दैनिक गोमन्तक

पणजी: गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे आणखी एक पदक सोमवारी निश्चित झाले. पदकाचा रंग मंगळवारी स्पष्ट होणार असून पुरुषांच्या मिडलवेट गटात गोव्याच्या पुष्पेंद्र राठी याने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

( 336 National Sports Tournament Pushpendra Rathi reached Boxing semi-final )

पुष्पेंद्र उपांत्य फेरीत पराभूत झाला, तरी त्याला ब्राँझपदक मिळेल. अंतिम फेरी गाठल्यास तो सुवर्ण अथवा रौप्यपदकासाठी खेळेल. पुरुषांच्या उपांत्य लढतीत त्याच्यासमोर मंगळवारी मिझोरामचे मालास्वॉमित्लुआंगा यांचे आव्हान असेल. उपांत्य फेरीत गाठताना गोव्याच्या बॉक्सरने उत्तर प्रदेशच्या गगनदीप याच्यावर 5-0 फरकाने सहज विजय मिळविला. त्यापूर्व त्याने आगेकूच राखताना हिमाचल प्रदेशच्या धरमपाल याला तिसऱ्याच फेरीत माघार घेण्यास भाग पाडले होते.

गुजरातमधील राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे तीन बॉक्सर्स सहभागी झाले होते. त्यापैकी महिलांत प्रीती चव्हाण हिचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. अशोक पाटील याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, तर पुष्पेंद्रने उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेसाठी गोव्याच्या बॉक्सर्सची 25 जुलैपासून प्रशिक्षक संतोष बिरमोले, चितंबरम नाईक, वालंकी धुमासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू होती.

या पदकामुळे बॉक्सिंगला प्रोत्साहन लाभेल

‘‘गोवा क्रीडा प्राधिकरण आणि गोवा ऑलिंपिक संघटनेच्या सहकार्याने आम्ही आश्वासनपूर्तीकडे निघालो आहोत. बॉक्सिंग हा गोव्याचा पदक विजेता खेळ आहे. यावेळच्या पदकामुळे बॉक्सिंगला प्रोत्साहन लाभेल आणि घरच्या मैदानावरील आगामी राष्ट्रीय स्पर्धेत जास्त पदके जिंकण्याची प्रेरणा लाभेल,’’ असे गोवा बॉक्सिंग संघटनेच्या सचिव दानुस्का दा गामा यांनी सांगितले.

चौथ्या पदकाच्या वाटेवर

गोव्याने 36 व्या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत तीन ब्राँझपदके जिंकली आहे. पुरुषांच्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्समध्ये अभिजित निंबाळकर याला, महिलांच्या 200 मीटर वैयक्तिक मेडलीत श्रुंगी बांदेकर हिला, तर बीच व्हॉलिबॉलमध्ये रामा धावसकर व ॲरोन परेरा जोडीस ब्राँझपदक मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT