16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने (Chess Masters Indian Teenager Pragyananda) या वर्षी दुसऱ्यांदा मॅग्नस कार्लसनचा पराभव करुन बुद्धिबळ मास्टर्सच्या पाचव्या फेरीत विद्यमान विश्वविजेत्याला मागे टाकले. या वर्षाच्या सुरुवातीला प्रज्ञानंदने कार्लसनचा पराभव केला होता. आता तीन महिन्यांनंतर त्याने कार्लसनला मागे टाकत पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. (16-year-old Indian Grandmaster R Pragyanand defeated Magnus Carlsen for the second time this year)
दरम्यान, चेसबल मास्टर्स ही 16 खेळाडूंची ऑनलाइन जलद बुद्धिबळ (Chess) स्पर्धा आहे. ज्यात कार्लसन आणि प्रज्ञानंद ड्रॉकडे जात होते, परंतु कार्लसनने त्याच्या 40 व्या चालीवर मोठी चूक केली ज्याचा प्रज्ञानंदने फायदा घेतला आणि कार्लसनला पराभूत करण्यात यशस्वी झाला.
तसेच, या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाइन रॅपिड टूर्नामेंटमध्ये कार्लसनला पराभूत करण्याची अप्रतिम कामगिरी केली होती.
शिवाय, चेसबल मास्टर्स स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवसानंतर कार्लसन 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर प्रज्ञानंद 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. चीनचा वेई 18 गुणांसह अव्वल, डेव्हिड अँटोन 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.