...म्हणून मॅथ्यू वेडने केली तोडफोड

ड्रेसिंग रूमची तोडफोड करणाऱ्या मॅथ्यू वेडला IPL ने दिला नियमांचा धडा.
Matthew Wade
Matthew WadeDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएलच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला आहे. गुरुवारी 19 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मॅथ्यू वेड (Matthew Wade) चर्चेत आला होता. हा ऑस्ट्रेलियन विकेटकीपर-फलंदाज खेळात नाही तर ड्रेसिंग रुममधील त्याच्या कृत्यांमुळे अडचणीत आला आहे. मॅथ्यूने आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रूमची तोडफोड केली होती. (Matthew Wade was outraged by being out of the match)

Matthew Wade
विराट कोहलीने बेंगळुरूसाठी केला खास 'विक्रम'

मॅथ्यूच्या या कृत्याबद्दल इंडियन प्रीमियर लीगने (IPL 2022) त्याला फटकारले आहे. आयपीएलने हे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, "मॅथ्यूला लेव्हल 1 गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आणि आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत शिक्षा दिली आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो.

आयपीएलने आपल्या निवेदनात मॅथ्यूच्या उल्लंघनाचे कोणतेही कारण दिलेले नाहीये. ग्लेन मॅक्सवेलला आऊट केल्यानंतर मॅथ्यूने पॅव्हेलियनमध्ये जात असताना आधी मॅक्सवेलशी बोलला आणि नंतर विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्याबद्दल सहानुभूती देखील व्यक्त केली. गुजरात टायटन्सच्या या फलंदाजाला सहाव्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते, तर त्याने 13 चेंडूत 16 रन्स् केल्या आहेत.

Matthew Wade
मदत मागितल्याने बाहेर पडल्या विराट कोहली अन् जोस बटलरच्या भावना

मॅक्सवेलच्या चेंडूवर पंचाने मथ्यूला एलबीडब्ल्यू आऊट केले. या निर्णयामुळे तो खूप निराश झाला. मॅक्सवेलच्या लेन्थ चेंडूवर वेडला स्वीप मारायचा होता, पण चेंडू थेट पॅडवर लागला. गोलंदाज आणि फील्डर यांच्या अपीलनंतर अंपायरने त्याला आऊट दिला. मॅथ्यू ने या निर्णयावर अपील केले आणि रिव्ह्यू देखील घेतला, रिव्ह्यू पाहिल्यानंतर थर्ड अंपायरनेही त्याला आउट घोषित केले.

निकाल आल्यानंतर मॅथ्यू जास्तच संतापला. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यानंतर त्याने आपला राग बाहेर काढला आणि आधी हेल्मेट फेकून दिले मग बॅट जमिनीवरती आदळली, मॅथ्यूने ड्रेसिंग रुममधील अनेक वस्तूंचे नुकसान करताना कॅमेरामध्ये दिसून आला. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com