Yash Chowde Dainik Gomantak
क्रीडा

Yash Chowde: केवळ 13 वर्षांच्या फलंदाजाचा भीम पराक्रम; 178 चेंडूत फटकावल्या नाबाद 508 धावा

तब्बल 81 चौकार, 18 षटकारांची बरसात; मुंबई इंडियन्स ज्युनियर स्कूल स्पर्धेत रचला इतिहास

Akshay Nirmale

Yash Chowde: सध्या क्रिकेट विश्वात एक अविश्वसनीय खेळी चर्चेत आहे. कोणत्याही दिग्गज खेळाडूने ही खेळी केलेली नाही, तर एका 13 वर्षांच्या फलंदाजाची ही खेळी आहे. यश चावडे असे या खेळाडुचे नाव आहे. तो महाराष्ट्राचा आहे. यशने अवघ्या 40-40 षटकांच्या सामन्यात अवघ्या 178 चेंडूत 508 धावांची नाबाद खेळी केली आहे. मुंबई इंडियन्स ज्युनियर स्कूल टूर्नामेंटमध्ये या फलंदाजाने हा पराक्रम केला आहे.

सरस्वती शाळेच्या वतीने खेळताना यशने ही अप्रतिम खेळी साकारली. या खेळाडूने 508 धावा करण्यासाठी केवळ 178 चेंडू घेतले. या खेळीत 18 षटकार आणि 81 चौकारांचा समावेश होता. या खेळीमुळे सरस्वती शाळेच्या संघाने 714 धावांची मोठी मजल मारली. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ अवघ्या ५ षटकांत सर्वबाद झाला. इंटर स्कूल लिमिटेड षटकांच्या क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा करणारा यश हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या चिरथने 15 वर्षांखालील सामन्यात 553 धावांची खेळी केली होती. विश्वविक्रमात श्रीलंकेच्या या खेळाडूचे नाव आघाडीवर आहे.

यश हा स्केटिंगही करतो. वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत त्याने स्केटिंग केले आहे. राज्यस्तरावर त्याने स्केटिंगमध्ये सहभाग घेतला होता. पण त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. यशची ही खेळी क्रिकेटच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये आणि कुठल्याही वयोगटातील 500 धावांपेक्षा जास्त धावांची केवळ दहावी खेळी आहे. यात पाचवेळा हा कारनामा भारतीय फलंदाजांनी केला आहे. यशपुर्वी

प्रणव धनवडे (नाबाद 1009 रन), प्रियांशु मोलिया (556 रन), पृथ्वी शॉ (546 रन) आणि डाडी हावेवाला (515) यांनी 500 हून अधिक धावांची खेळी केली होती. या चारही फलंदाजांनी एकाहून अधिक दिवसांच्या सामन्यात या धावा बनवल्या आहेत. यशने मर्यादीत षटकांच्या सामन्यात 500 हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT