आपल्या खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. चुकीची लाइफस्लटाइल आणि खाण्या-पिण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. जर तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवले अनेक आजार दूर राहतात.
14 मार्च हा दिवस जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये लोकांना किडनी निरोगी ठेवण्याबद्दल आणि त्यासंबंधित आजारांबद्दल सतर्क केले जाते. किडनी निरोगी ठेवायचे असेल तर पुढील पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
बिझी लाइफस्टाइल आणि स्वयंपाकातील आळस यांच्यासमोर फास्ट फूड हा सर्वोत्तम पर्याय वाटतो. पिझ्झा, बर्गर, मोमोज खाल्ल्याने एक वेळ जिभेचे चोचले पुरतात. जर तुम्हालाही फास्ट फूड खाण्याचे व्यसन लागले असेल तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे किडनी खराब होऊ शकते. कारण त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते आणि हे किडनीसाठी हानिकारक असते. मूत्रपिंडाच्या समस्या टाळण्यासाठी, कमी तेल, मीठ आणि मसाले घालून घरी तयार केलेले पदार्थ खावे.
अनेक लोकांना ब्रेड खायला खुप आवडते. त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ देखील तयार केले जातात. त्यामुळे तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की याचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो. ब्रेडमध्ये फायबरसह फॉस्फरस आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे किडनी खराब होऊ शकते.
जास्त सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोडा पिणे देखील किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कारण त्यात फॉस्फरस आढळते. हे किडनीसाठी हानिकारक असते. जर तुम्ही आधीच किडनीच्या समस्येने त्रस्त असाल तर सोड्याचे सेवन टाळाले पाहिजे.
टोमॅटोचा वापर डाळींपासून भाज्या आणि अगदी सॅलडपर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. परंतु किडनीशी संबंधित समस्या असेल तर टोमॅटो खाणे टाळावे. पहिली गोष्ट म्हणजे टोमॅटोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे किडनी कमकुवत होते आणि दुसरे म्हणजे टोमॅटोच्या बिया सहज पचत नाहीत. त्यामुळे किडनी त्यांचे काम नीट करू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.