World Hemophilia Day 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Hemophilia Day 2023: हिमोफिलिया म्हणजे का? जाणून घ्या याची लक्षणं

या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

World Hemophilia Day 2023: जागतिक हिमोफिलिया दिवस दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाचे संस्थापक फ्रँक श्नबेल यांचा जन्म 17एप्रिल रोजी झाला. 

म्हणूनच हा दिवस हिमोफिलिया आणि संबंधित रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरुकतेसाठी साजरा केला जातो. 

  • हिमोफिलिया म्हणजे काय?

हिमोफिलियामध्ये रक्त गोठण्याची क्षमता गंभीरपणे कमी होते. यामुळे हिमोफिलियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला किरकोळ जखमा होऊनही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होतो.

हिमोफिलिया हा रोग सामान्यतः जनुकातील उत्परिवर्तन किंवा बदलामुळे होतो. ज्यामध्ये 'रक्ताची गुठळी' बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लॉटिंग फॅक्टर प्रथिने तयार करण्याच्या सूचना दिल्या जातात.

जनुकातील अशा प्रकारचा बदल किंवा उत्परिवर्तनामुळे गोठलेल्या प्रथिनांना योग्य प्रकारे कार्य करण्यापासून रोखता येते. ही जनुके X गुणसूत्रावर असतात. महिलांपेक्षा (Women) पुरुषांना हिमोफिलिया आजार होण्याची अधिक शक्यता असते.

यामागील कारण म्हणजे मुलाचे लिंग ज्या पद्धतीने ठरवले जाते. त्यामध्ये आनुवंशिकता गुंतलेली असते. जरी हिमोफिलिया रोग हा अत्यंत दुर्मिळ प्रकारचा आजार आहे. 10,000 लोकांपैकी सुमारे 1 व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे.

  • हिमोफिलियाची कारणे

  1. आनुवंशिकता

  2. कर्करोग

  3. मल्टीपल स्क्लेरोसिस

  4. गर्भधारणा

  5. औषधांची रिऍक्शन

  • हिमोफिलियावर उपचार

हिमोफिलियावर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अनुपस्थित क्लोटिंग घटक बदलणे होय. या पद्धतीच्या मदतीने रक्त गोठण्याची प्रक्रिया सामान्य करण्यास मदत होते.

या प्रक्रियेअंतर्गत इंजेक्शनद्वारे कृत्रिमरित्या तयार केलेले क्लॉटिंग घटक रुग्णाच्या नसांमध्ये सोडले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT