Nails Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nails Care: नखांवर पांढरे डाग का पडतात? वाचा तज्ञांचे मत

जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर प्रथम तुमची नखे पाहतात. कारण अनेकदा नखांवर पांढरे डाग तयार होतात.

Puja Bonkile

Nails Care: आजार लहान असो वा मोठा, आपण डॉक्टरांकडे जातो. तुम्हाला माहीत आहे का डॉक्टर आधी नखे का तपासतात? अनेकदा असे घडते की आपले शरीर स्वतःच रोगांची लक्षणे द्यायला लागते, त्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे आपल्या नखांवरही काही आजारांची लक्षणे दिसतात. 

नखांच्या शेवटच्या भागावर पांढरा भाग असतो. याला लुनुला म्हणतात. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की नखांवर पांढरे डाग पडतात, जे अनेक प्रकारचे आजारांचे लक्षण असतात. चला जाणून घेऊया नखांवर पांढऱ्या रंगाचे डाग येण्याचे कारण काय आहे?

  • नखांवर पांढरे डाग येण्याचे कारण कॅल्शियम नाही

नखांवर पांढरे डाग आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की हे डाग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात.पण असे अजिबात नाही. नखांवर पांढरे डाग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत नाहीत. 

अहवालानुसार नखांवर पांढरे डाग मुख्यतः लहान मुलांमध्ये दिसतात. याची 2 प्रमुख कारणे आहेत. पहिले शरीरातील पोषक तत्वांच्या अती कमतरतेमुळे म्हणजेच कुपोषणामुळे आणि दुसरे शरीरात रक्तातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे नकांवर डाग पडतात.  

  • नखांवर पांढरे डागांचे वैज्ञानिक नाव 

सायन्स फोकसच्या अहवालानुसार नखांवर पांढरे डाग तात्पुरते असतात. नखांवरचे हे पांढऱ्या रंगाचे डाग दिसल्यानंतर हळूहळू निघून जातात. नखं हळूहळू वाढतात म्हणूनच वाढीसह पुढे जाताना नखांवरचे हे पांढरे डाग अदृश्य होतात. नखांवरच्या या पांढऱ्या खुणांचे शास्त्रीय नाव ‘ल्युकोनीचिया’ आहे.

  • कोणत्या आजारांचे लक्षण

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, नखांवर पांढरे डाग येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात मिनरल्सची कमतरता, पण हे आजारांचे लक्षणही मानले जाते. अनेकदा किडनी निकामी होणे, हृदयविकार, न्यूमोनिया, एक्जिमा, आर्सेनिक विषबाधा यांसारख्या आजारांमुळेही नखांवर पांढरे डाग पडतात. 

पण अशी प्रकरणे आतापर्यंत क्वचितच आढळून आली आहेत. बुरशीजन्य संसर्ग, ऍलर्जी आणि नखांना दुखापत झाल्यामुळे नखांवर पांढरे डागही दिसतात. 

सुंदर नखांसाठी या पदार्थांचे करावे सेवन

  • अंडी

अंड्यांमध्येही भरपूर प्रमाणात बायोटिन असते. याशिवाय यात प्रथिने, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. यामुळे नखांची वाढ होण्यास मदत होते.

  • पालक

पालकमध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते.याचबरोबर यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. पालक खाल्याने नखांची चांगली वाढ होते.

  • केळी

केळामध्ये बायोटिन घटक असतात. यामुळे केस मजबूत होतात. याचा फायदा नखे तुटत नाहीत. याशिवाय नखांची वाढ होण्यास मदत होते.

  • अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते. अक्रोड नखांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT