Vitamin B12 Rich Vegan Food: B12 कमी म्हणून काळजी करु नका, 'या' पदार्थांतून मिळेल 'Vitamin B12' भरपुर

धावपळीच्या जीवनशैलीत शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता जाणवत आहे.
Vitamin B12 Rich Vegan Food
Vitamin B12 Rich Vegan FoodDainik Gomantakl
Published on
Updated on

Vitamin B12 Rich Vegan Food: धावपळीच्या जीवनशैलीत शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता जाणवत आहे. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12 आहे.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये अशक्तपणा, थकवा, आणि नैराश्य यासारख्या समस्यांचा समावेश आहे. दीर्घकाळ त्याची कमतरता मेंदूला हानी पोहोचवू शकतात.

या व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढण्यासाठी मासे, चिकन, अंडी आणि दूध यासारख्या पदार्थांचे स्वन करावे. जे लोक दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत त्यांना याची कमतरता अधिक जाणवते. चला तर मग जाणून घेउया की असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते.

  • पालक

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वात पौष्टिक मानली जाणारी भाजी आहे. शाकाहारी लोकांसाठी पालक हे पॉवरहाऊसपेक्षा कमी नाही. तसेच व्हिटॅमिन बी 12 सह, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळते. पालकाचा आहारात रस किंवा सूप म्हणून देखील सेवन करु शकता.

  • बीट

बीटमध्ये लोह, पोटॅशियम आणि फायबरसह व्हिटॅमिन बी 12 देखील आढळते. बीट शरीरातील रक्त परिसंचरण नियमित आणि चांगले ठेवण्यास मदत करते. बीटचा रस किंवा सॅलडच्या स्वरूपात आहारात समावेश करून व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर केली जाऊ शकते.

Vitamin B12 Rich Vegan Food
World Elder Abuse Awareness Day: घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींशी असं वर्तन केल्यास होईल असा परिणाम
  • मशरूम

मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. जे लोक नियमितपणे मशरूम खातात त्यांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची समस्या जाणवत नाही. यामुळे रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करावा.

  • सोयाबीन

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हे व्हिटॅमिन बी 12 चा उत्तम स्रोत आहे. सोया दूध किंवा टोफूच्या स्वरूपात आहारात समावेश करावा. यासोबत सोया चंक्स भाजी किंवा तांदळाच्या डिशमध्ये मिसळता येतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com