Vastu Tips For Home: पावसाळ्याला सुरुवात झाली असून गरमीपासून दिलासा मिळाला आहे. या ऋतूमध्ये केवळ स्वत:चीच नव्हे तर घराची देखभालही करणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार या ऋतूत घराच्या देखभालीसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार पावसाळा हा नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा ऋतू आहे. वास्तूनुसार पाऊस आणि सकारात्मकता यांचा खोल संबंध आहे. पावसाचा नातेसंबंध आणि घरातील आनंदावरही परिणाम होतो. पावसाळ्यात घराती कशी काळजी घ्यावी याबाबद वास्तुशास्त्रात उपाय सांगितले आहे. ज्यामुळे नातेसंबंधांवर आणि घरावर चांगला परिणाम होतो.
सकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार पाऊस पडल्यानंतर घराच्या ईशान्य दिशेला खिडकीचे दरवाजे उघडे ठेवावेत. दक्षिण-पूर्वेकडील खिडक्या आणि दारांमधून पावसाचे पाणी आत जाऊ न देण्याचा प्रयत्न करा. यामुळे घराच्या आत प्रवेश करणार्या उर्जेमध्ये अग्नीचे घटक असतात, जे चांगल्या उर्जेशी टक्कर देतात. यामुळे तुमच्या घरात गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. वास्तूनुसार घरातील कोणत्याही ठिकाणाहून पाणी गळत असेल तर ते चांगले मानले जात नाही. म्हणूनच, जर तुमच्या घरात हे घडत असेल तर प्रथम ते दुरुस्त करा.
झाडे लावावे
पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. या ऋतूत तुम्हीही घरात झाडे लावु शकता. हँगिंग प्लांट्स विशेषतः खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये लावु शकता. यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच पण घरात आनंदही टिकून राहते.
लेमनग्रास
पावसाळ्यात घरात लेमनग्रास लावावे. या वनस्पतीमध्ये केवळ वैद्यकीय गुणधर्मच नाहीत तर ते घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते.
घरात कीटकनाशक फवारणी करावी
पावसाळ्यासाठी घर व्यवस्थित करण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात कीटकनाशकांची फवारणी करावी. स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या नाल्यांमध्ये सर्वाधिक किटक येण्याची शक्यता असते. घरातील घाणीमुळे नकारात्मक ऊर्जा येते. म्हणूनच घरात ओलसर होऊ देऊ नका आणि घाण पाणी भरू देऊ नका.
घरातील इलेक्ट्रीक उपकरणांची काळजी
घरामध्ये एखाद्या ठिकाणी अनेक वायर उघड्या पडल्या असतील तर पावसाळ्यात ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. वास्तूनुसार यामुळे आरोग्याला हानी तर होतेच पण घरात सुखाऐवजी दु:खाचे सावट येउ शकते. तसेच खराब इलेक्ट्रीक उपकरणांची दुरुस्ती करावी.
कापूर लावावा
पावसाळ्यात घरामध्ये कापूर जाळावा. यामुळे घरातील हवा शुद्ध होते. या ऋतूमध्ये होणाऱ्या डासांपासून घराचे संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या पाण्याने घर स्वच्छ करावे. तसेच घरात कडुलिंबाची पाने जाळल्यास अनेक आजार दूर होतात.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.