Periods Pain Remedy: मासिक काळातील वेदना खूप असह्य असतात. रक्तस्राव जास्त झाल्यास हा त्रास अधिक दुहेरी होतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान कंबर आणि पोटदुखीची समस्या जास्त असेल तर काही हे औषधी वनस्पती तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरतील.
मासिक पाळीत चिडचिड होणे, मूड बदलणे आणि ओटी पोटात दुखणे यासारख्या समस्या सामान्य आहेत. 5 दिवस शरीरावर आणि मनावरही खूप ताण असतो. पण मासिक पाळीमधील वेदना सहन करण्याची गरज नाही. आहार, औषधी वनस्पती आणि विशिष्ट खनिजांसह नैसर्गिक उपायांमुळे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या देवना सहन करण्याची गरज नाही.
ओवा
ओवा खाल्याने मासिक पाळी नियमित येते. तसेच होणाऱ्या वेदना कमी होतात. ओवामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते. त्यात भरपूर लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी देखील असते. मासिक पाळीच्या वेळी महिला पोट फुगीची तक्रार करतात. पण ओवा खाल्यास या समस्या कमी होतात.
बडीशेप
बडीशेप तुमच्या गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देऊन मासिक पाळीतील अस्वस्थता कमी करते. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक कप कोमट पाण्यात बडीशेप टाकायची आहे. यानंतर त्यात मध घालून दिवसातून तीन वेळा सेवन करायचे आहे. यामुळे रक्तस्त्राव नियंत्रित होईल आणि मासिक पाळीचा त्रास कमी होईल. तुम्हाला पेनकिलरची गरज भासणार नाही.
आलं
आलं मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेले प्रोस्टॅग्लॅंडिन मासिक पाळीत होणारी अस्वस्थता आणि स्राव कमी करण्यास मदत करते. जर्नल पेन मेडिसिनच्या अहवालानुसार, ते शरीरातील कोणत्याही संभाव्य जळजळांना प्रतिबंधित करते आणि वेदना कमी करणारे म्हणून कार्य करते.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.