आयुष्यात यश, सुख, समाधान मिळविण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. पण कष्टाला नशीबाची देखील साथ असावी लागते असं सागितले जाते. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र यातील काही शास्त्रिय महत्व विषद करणा-या गोष्टी, सवयींचा अवलंब केला. तर अनेक महत्वपूर्ण बदल घडु शकतात. अशाच नशीबाला चमकवणाऱ्या पाच वस्तूंची माहिती आपण पाहणार आहोत, ज्या तुमच्या घरात असायलाच हव्यात.
पहिली आहे वाहत्या पाण्याचा धबधबा (Water Fountain) असं मानले जाते की वाहत्या पाण्याचा आवाज आपल्या घरात ऐकू येत असेल तर, त्यातून सकारात्मक उर्जा निर्माण होते. घराच्या आकारानुसार लहान किंवा मोठा वॉटर फाउंटन लावता येईल. ते लावत असताना उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे, इतर कोणत्याही दिशेला लावू नये. यामुळे घरात पैशाचा (Money Flow) येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतील.
दुसरी वस्तू आहे नैसर्गिक झाडे किंवा रोपे घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी घरात बांबू (Baboo) किंवा मनी प्लांट (Money Plant) ठेवावे. मनी प्लांट घरात जरूर ठेवावे पण त्यांच्या फांद्या जमिनीकडे यायला लागल्या तर ते अशुभ मानले जाते. मनी प्लांट नेहमी वरच्या दिशेने जाणारा असावा. प्लांट खालच्या दिशेने झुकत असेल तर, त्याला दोरीने वरती जाईल असे बांधावे. बांबूचे झाड देखील शुभ मानले जात असून त्याच्या वाढीसह आपली प्रगती होत असते.
धन्वंतरी देवतेचा फोटो (Lord Dhanvantari) ही या यादीतील तिसरी वस्तू आहे. धन्वंतरी देवता समुद्र मंधनातून प्रकट झाली होती. ती आपल्याला शुद्ध मन आणि आरोग्य प्रदान करतात. आपल्या घरातील प्रत्येकाचे शरिर व मन शुद्ध (Body and Mind) रहावे यासाठी घराच्या उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला धन्वंतरी देवतेचा फोटो लावावा. त्या फोटो समोर पाणी असलेला ताब्यांचा कलश ठेवावा. तेच पाणी घरातील सदस्यांनी थोडे थोडे करून प्यावे.
चौथी वस्तू ही कोणतीही लाल वस्तू (Red Item)असून ती घरातील दक्षिण दिशेला ठेवावी अथवा टांगून ठेवावी. प्रसिद्धी, कौतुक, वाहवा याचे प्रतिक लाल वस्तू असते. जसे लाल पेंटिंग (painting), फूलदानी असे काहीही असू शकते. शक्यतो नैसर्गिक फूलांची (Natural Flowers) फ्रेम किंवा फूलदाणी लावावी.
भिंतीवरचे घड्याळ (Wall Clock) ही पाचवी वस्तू आहे. घरातील घड्याळ नेहमी पश्चिम दिशेला असावे ते कधीच बेडरूममध्ये असू नये. घड्याळ धातूचेच (Metallic Watch) असावे तरच ते शुभ परिणाम देते. यामुळे आर्थिक समस्या सुटतील, उत्पन्नात वाढ होऊन खर्चाला आळा बसेल, पैशांची बचत होईल. (Economic Issues, Money Savings)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.