जगप्रसिद्ध ‘सनबर्न’बाबतचा संभ्रम सरकारने दूर करणे गरजेचे

दिलायला लोबो : पर्यटन खात्‍याच्‍या कॅलेंडरमध्ये महोत्‍सवाचा समावेश करावा; खात्‍याने नियंत्रण ठेवावे
Delilah Lobo
Delilah LoboDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हणजूण येथे दरवर्षी होणाऱ्या ‘सनबर्न’ संगीत महोत्‍सवाचा पर्यटन खात्‍याच्‍या कॅलेंडरमध्ये समावेश केला पाहिजे. तसेच हा महोत्‍सव होणार की नाही, याबाबतचा संभ्रम दूर करणे गरजेचे आहे. महोत्‍सवासाठी जगभरातून पर्यटक येतात. महोत्‍सव काळात सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक पर्यटक हणजूण परिसरात येतात.

या महोत्‍सवावर पर्यटन खात्‍याचे नियंत्रण असावे. तेथे अमलीपदार्थ विक्री होणार नाही तसेच कोणतेही अवैध किंवा अनैतिक प्रकार घडणार नाहीत यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना शिवोलीच्‍या आमदार दिलायला लोबो यांनी केली. पर्यटन खात्‍याच्‍या कपात सूचनांवरील चर्चेत त्‍या बोलत होत्‍या.

(Lobo's demand that government should provide MLAs to remove confusion regarding world-famous 'sunburn')

Delilah Lobo
राज्यातील ‘ॲप आधारित टॅक्सीबाबत विश्‍वासात घ्या’

शिवोली मतदारसंघातील हणजूण येथे ‘स्‍वदेश दर्शन’ योजनेखाली स्‍वच्‍छता गृह आणि शौचालय बांधण्यात आले. दोन वर्षांपूर्वी त्‍याचे उद्‌घाटनही झाले मात्र ते अद्यापही कार्यरत नाही. येथील पार्किंगची जागा पंचायतीकडे सुपूर्द करा किंवा एखाद्या व्‍यक्‍तीकडे द्या. शिवोलीतील गाडेधारकांना नवीन शेडमध्ये स्‍थलांतरित करावे. तसेच यापूर्वी केलेल्‍या घोषणेनुसार वायफायची सोय करावी. तसेच परिसरात सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना लोबो यांनी केली. तसेच शिवोली मतदारसंघात अनेक फुटबॉलपटू आहेत, मैदानाची वानवा आहे. क्रीडा खात्‍याने शिवोलीत मैदान उभारावे, अशी मागणी लोबो यांनी केली.

भिकारी, फिरत्‍या विक्रेत्‍यांना आवरा

किनाऱ्यांवर फुटलेल्‍या काचेच्‍या बाटल्‍या टाकलेल्‍या दिसून येतात. तसेच स्‍वच्‍छता गृह आणि शौचालयांचीही गरज आहे. रात्रीच्‍या वेळी भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांवर नियंत्रण असले पाहिजे. तसेच दिवसभर पर्यटकांना त्रास देणाऱ्या फिरत्‍या विक्रेत्‍यांवरही कारवाई करणे आवश्‍यक असल्‍याचे लोबो म्‍हणाल्‍या. अशा गोष्टींमुळे गोव्‍याचे नाव बदनाम होते. तसेच एखादी वाईट गोष्ट घडली की त्‍याची जगभर चर्चा होते. यात पर्यटनमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी सूचना लोबो यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com