App Based Taxi in Goa : गोव्यात ॲप आधारित टॅक्सी हेच आता ‘न्यू नॉर्मल’

मंत्री मॉविन गुदिन्हो यांचे पुरवणी मागण्यांवर विधानसभेत उत्तर
Mauvin Godinho | App based Taxi in Goa
Mauvin Godinho | App based Taxi in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक विभागाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून ॲप आधारीत टॅक्सी सेवेला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात येत आहे. हेच या पुढच्या काळातील ‘न्यू नॉर्मल’ असेल असे मत पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले. विधानसभेत पुरवणी मागणी आणि कपातीच्या सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

विधानसभेत पंचायत, वाहतूक आणि उद्योग खात्याच्या पुरवणी मागण्यांवर आणि कपाती सूचनेवर दीर्घ चर्चा झाली. विरोधकांकडून कपाती सूचना मांडण्यात आल्या तर सत्ताधारी गटाच्या आमदारांकडून मागण्यांना या खात्याच्या मागण्यांना संमती देणाऱ्या पुरवणी सूचना देण्यात आल्या. यानंतर उत्तर देताना गुदिन्हो म्हणाले, सरकारच्या वतीने इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा प्रयत्न असून नोव्हेंबरपर्यंत शंभरहून अधिक बसेस दाखल होतील. सध्या त्यांना चार्जिंग स्टेशनची गरज असून टप्प्याटप्प्याने ते उभारण्यात येतील. पर्यटनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनच्या वतीने न्यायालयात टॅक्सी मीटरच्या बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Mauvin Godinho | App based Taxi in Goa
गोव्यात खाणबंदी काळात 163 कोटींची भरपाई

मीटर बसवण्याचे न्यायालयाने दिलेला आदेश राज्य सरकारने पाळत 80 टक्के सवलत दिली. मात्र, टॅक्सीधारक या मीटरचा वापर करताना दिसत नाहीत. ते न्यायालयाची व सरकारची फसवणूक करत आहेत. दुसरीकडे पर्यटक आणि ग्राहकांची ही लूट चालूच आहे. हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या आपल्या राज्याला मानवणारे नाही. वाहतुकीच्या संदर्भात आणि टॅक्सी मीटरच्या संदर्भात रोजच अनेक तक्रारी आपल्याकडे येतात. यासाठी भविष्यातील चांगल्या पर्यटनासाठी ॲप आधारित टॅक्सी सेवेला पर्याय नाही. आम्ही ओला, उबर यांना निमंत्रित करत नाही. मात्र, सध्याच्या स्थितीत ऍग्रिगेटर टॅक्सी सेवा स्वीकारावीच लागेल. असेही मंत्री गुदिन्हो म्हणाले.

उद्या नव्या उद्योग धोरणाला मान्यता

शुक्रवारपर्यंत राज्याचे नवे उद्योग धोरण जाहीर करण्यात येईल. त्यावर विधानसभा सदस्यांची ही मते घेतली जातील. राज्यात औद्योगिक विकासासाठी नव्या पारदर्शक आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या उद्योग धोरणाची आवश्यकता असल्याचे उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com