Type 5 Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Type 5 Diabetes: टाइप-5 मधुमेहाचा धोका कोणाला? आजार ओळखून वेळीच व्हा सावध!

Type 5 Diabetes Symptoms: टाइप-5 मधुमेह हा कुपोषणामुळे होणारा आजार आहे. अन्नातील पोषक तत्वांचा अभाव हा आजार निर्माण करतो. जर एखाद्या व्यक्तीच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन झाले असेल आणि ती व्यक्ती कुपोषणाने ग्रस्त असेल तर त्याला टाइप-5 मधुमेह होऊ शकतो.

Manish Jadhav

टाइप-5 मधुमेह… हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा कोणत्या प्रकारचा मधुमेह आहे. कारण आतापर्यंत बहुतेकदा टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहाबाबत ऐकले वाचले. पण अलिकडेच आंतरराष्ट्रीय डायबिटीज फेडरेशनने टाइप-5 मधुमेहाबाबत माहिती दिली आहे. हा आजार पूर्वी आफ्रिकेत होत होता. पण आता इतरही अनेक देशांमध्ये याची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

टाइप-5 मधुमेह

टाइप-5 मधुमेह हा कुपोषणामुळे होणारा आजार आहे. अन्नातील पोषक तत्वांचा अभाव हा आजार निर्माण करतो. जर एखाद्या व्यक्तीच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन झाले असेल आणि ती व्यक्ती कुपोषणाने ग्रस्त असेल तर त्याला टाइप-5 मधुमेह होऊ शकतो. या आजारात व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनचे उत्पादन कमी होऊ लागते. ज्या लोकांचे वजन कमी आहे, म्हणजेच ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा कमी आहे, त्यांना या आजाराचा धोका असतो.

टाइप 5 मधुमेह 'जुनाट आजार'

हा आजार पहिल्यांदा आफ्रिकेतील जमैका येथे आढळून आला. यानंतर, आफ्रिकेच्या इतर भागातही या आजारासंबंधी प्रकरणे नोंदवली गेली. 1995 मध्ये, या आजाराला टाइप-5 मधुमेहाच्या वेगळ्या श्रेणीत ठेवण्यात आले आणि त्याला टाइप-जे मधुमेह असे नाव देण्यात आले. परंतु 2000 सालापर्यंत या आजाराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती आणि त्यावर कोणतेही संशोधन झाले नव्हते. त्यावेळी, या आजाराच्या प्रकरणांचे अहवाल कमी झाले होते आणि प्रकरणांची संख्या देखील कमी झाली होती.

त्यानंतर या आजाराला दिलेली टाइप-जे मधुमेहाची मान्यता रद्द करण्यात आली. पण आता आंतरराष्ट्रीय डायबिटीज फेडरेशनने त्याला 'टाइप-5 मधुमेह' असे नाव दिले आहे. या आजाराच्या वाढत्या घटनांमुळे हे नाव देण्यात आले. आता या आजाराबद्दल हे स्पष्ट झाले आहे की, कुपोषित लोकांमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो. जर एखाद्याच्या शरीरात जनुके उत्परिवर्तित होत असतील तर तो या आजाराचा शिकार बनू शकतो.

रुग्णांची ओळख पटवणे सोपे होईल

अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनमधील प्राध्यापक मेरेडिथ हॉकिन्स सांगतात, आता या आजाराचे रुग्ण ओळखणे सोपे होईल. टाइप-5 मधुमेह असलेल्या रुग्णांवर उपचार कसे करावे हे आता डॉक्टरांना नेमके समजेल. आता या आजाराचे रुग्ण (Patients) येत आहेत, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पूर्वी, नावांअभावी रुग्णांची ओळख पटत नव्हती. आता या आजाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी काम केले जाईल. यासाठी आयडीएफने एक टीम तयार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT