Diabetes and Vision: Early Symptoms You Shouldn’t Ignore
Diabetes and eye healthDainik Gomantak

Diabetes: मेधुमेही रुग्णांनो सावधान! डोळ्यांतील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो

Diabetes And Eye Health: मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांच्या संदर्भात काही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही तुमची दृष्टी कायमची गमावू शकता. चला तर मग या लक्षणांबाबत जाणून घेऊया...
Published on

देशात मागील काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. यासोबतच, त्याचा अनेक अवयवांवरही विपरीत परिणाम होतो. मधुमेहाचा मूत्रपिंड आणि हृदयावर परिणाम होतो. याशिवाय, डोळ्यांवरही परिणाम होतो. मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांच्या संदर्भात काही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही तुमची दृष्टी कायमची गमावू शकता. चला तर मग या लक्षणांबाबत जाणून घेऊया...

दृष्टी कायमची गमावू शकता

मधुमेह (Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे. सुरुवातीला मधुमेहाची लक्षणे बराच काळ जाणवत नाहीत. मधुमेहाचे निदान होईपर्यंत शरीराच्या अनेक भागांना आधीच हानी पोहोचते. म्हणून वयाच्या पंचवीशीनंतर मधुमेहासंबंधी चाचण्या सातत्याने कराव्यात. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढते तेव्हा त्याची लक्षणे डोळ्यांमध्येही दिसू लागतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अंधुक दृष्टी समाविष्ट आहे. ही लक्षणे दिसल्यानंतर वेळेवर उपचार घेतले नाहीतर तुम्ही कायमची दृष्टी गमावू शकता.

Diabetes and Vision: Early Symptoms You Shouldn’t Ignore
Diabetes: मधुमेहामुळे कशी होते किडनी खराब? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय आणि तज्ञांचा सल्ला

लक्षणे काय आहेत?

मधुमेहानंतर डोळ्यांचा सर्वात गंभीर आजार ग्लूकोमाचा धोका कायम राहतो. त्यामुळे या आजाराला प्रतिबंधित करणे आवश्यक ठरते. ग्लूकोमामुळे नुकसान झालेल्या डोळ्यांवर उपचार शक्य नाहीत. याशिवाय, मधुमेहामुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू देखील होऊ शकतो. मधुमेहामुळे डोळ्यांच्या लहान रक्तवाहिन्यांची मोठी हानी होते, ज्यामुळे सुरुवातीला दृष्टी अंधुक होते. याशिवाय, डोळ्यांमध्ये सूज आणि जळजळ देखील होऊ शकते.

Diabetes and Vision: Early Symptoms You Shouldn’t Ignore
Diabetes Biobank: भारतात बनली पहिली डायबिटीज बायोबँक; जाणून घ्या, ती कुठे आहे अन् शुगर नियंत्रणात कशी करेल मदत?

स्वतःचे असे रक्षण करा

मधुमेहामुळे होणारे ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारखे आजार टाळण्यासाठी डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसल्यास उशीर करु नका. ताबडतोब डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घेऊन उपचार सुरु करा. यासोबतच, तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी बदलून साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकता. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली नाहीतर डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com