Diabetes: महिलांसाठी धोक्याची घंटा! टाइप 2 मधुमेहामुळे वाढतो लिवर अन् पॅंक्रियाटिक कॅन्सरचा धोका; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Diabetes And Cancer Risk: ज्या लोकांना अलीकडेच टाइप 2 मधुमेहाचे निदान झाले आहे त्यांना यकृत आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.
Diabetes
DiabetesDainik Gomantak
Published on
Updated on

New Study Links Type 2 Diabetes to Increased Risk of Liver and Pancreatic Cancer

भारतात मधुमेह आणि कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः टाइप 2 मधुमेह हा आता केवळ रक्तातील साखरेशी संबंधित आजार मानला जाऊ शकत नाही. एका नवीन अभ्यासातून चकित करणारे सत्य समोर आले आहे. ज्या लोकांना अलीकडेच टाइप 2 मधुमेहाचे निदान झाले आहे त्यांना यकृत आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. विशेषतः महिलांमध्ये हा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे. हा अभ्यास समोर आल्यानंतर आरोग्य तज्ञ आणि सामान्य लोकही चिंतेत आहेत. कालपर्यंत मधुमेह हा फक्त साखरेचा आजार मानला जात होता, पण आता त्यामुळे यकृत आणि पोटाशी संबंधित आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढला आहे.

महिलांना पाच पट जास्त धोका

दरम्यान, या अभ्यासात पुढे सांगण्यात आले की ज्या महिलांना अलीकडेच टाइप 2 मधुमेह झाला आहे त्यांना यकृताच्या कर्करोगाचा धोका पाच पटीने तर स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा (Cancer) धोका दुपटीने वाढतो. पुरुषांसाठीही ही परिस्थिती चिंताजनक आहे, कारण त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका 74 टक्के आहे. तर यकृताच्या कर्करोगाचा धोका चार पटीने वाढतो.

Diabetes
Diabetes: मधुमेहामुळे कशी होते किडनी खराब? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय आणि तज्ञांचा सल्ला

अभ्यासात पुढे सांगण्यात आले की, टाइप 2 मधुमेह झाल्यानंतर यकृताच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो. मधुमेह असलेल्या महिलांमध्ये आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता 34 टक्क्यांनी तर पुरुषांमध्ये ती 27 टक्क्यांनी वाढते.

अभ्यासातून धक्कादायक खुलासे

दरम्यान, या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी यूके बायोबँकमधील डेटा वापरला, ज्यामध्ये 95,000 लोकांच्या वैद्यकीय नोंदी तपासल्या गेल्या. यापैकी 23,750 लोकांना अलीकडेच मधुमेहाचे निदान झाले होते, तर 70,000 हून अधिक लोक मधुमेहमुक्त होते. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर जेव्हा लोक अधिक वैद्यकीय चाचण्या करतात तेव्हा कर्करोगाचे निदान होऊ शकते. मधुमेह झाल्यानंतर एक वर्षानंतरही कर्करोग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Diabetes
Diabetes: मुलांना डायबिटीजच्या धोक्यापासून वाचवायचे असेल तर 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात; आयुष्यभर राहील निरोगी

मधुमेहामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो

दुसरीकडे, मधुमेहामुळे (Diabetes) कर्करोगाच्या इतर प्रकाराचा धोका वाढत नसल्याचे देखील समोर आले. महिलांमध्ये, एंडोमेट्रियल (गर्भाशयाचा) कर्करोग आणि पोस्ट-मेनोपॉजल ब्रेस्ट कर्करोगाचा धोका मधुमेहामुळे प्रभावित झाला नाही. याचा अर्थ असा की, मधुमेहामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

महिलांना धोका का जास्त आहे?

शास्त्रज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल बदल, शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता आणि चरबीचे प्रमाण वाढणे ही काही संभाव्य कारणे असू शकतात.

Diabetes
Diabetes: मधुमेही रुग्णांनी बटाटा खाणे बंद करावे का? अशाप्रकारे आहारात करा बटाट्याचा समावेश; तज्ज्ञांनी दिला सल्ला

प्रतिबंधात्मक उपाय

मधुमेही रुग्णांनी कर्करोगाची तपासणी करावी.

निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा.

वजन नियंत्रणात ठेवावे.

निरोगी आहार घ्यावा.

नियमित व्यायाम करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com