Maharashtra Din 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Maharashtra Din 2022: 'लय भारी' महाराष्ट्रीयन पदार्थांचा झणझणीत स्वाद

यंदाचा महाराष्ट्र दिन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही काही पारंपारिक पदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. 1960 मध्ये या दिवशी महाराष्ट्राच्या रूपाने भारताला नवे राज्य मिळाले आहे. राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सरकारी सुट्टीचा अस्वाद घेतला जातो असं म्हणायला हरकत नाही. हा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे परेड, उत्सव इत्यादींचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यांमध्ये राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मोठे नेते आणि इतर लोक तसेच सामान्य जनताही आनंदात सहभागी होते. (Take Maharashtra Day The taste of spicy and delicious food)

यंदाचा महाराष्ट्र दिन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही काही पारंपारिक पदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकता. महाराष्ट्रातील (Maharashtra) बरेच पदार्थ फक्त आपल्या राज्यातच नाहीत तर देशात, त्याचबरोबर जगभरात देखील प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यातीलच काही प्रसिद्ध पदार्थ जाणून घेणार आहोत.

मिसळ पाव :

मिसळ पाव हा महाराष्ट्राचा एक झणझणीत पदार्थं आहे. मिसळ म्हणजे वेगवेगळे कडधान्य एकत्र करून तयार केलेला तिखट रस्सा. कांदा, लिंबू, भरपूर फरसाण आणि पाव यांच्यासोबत आपण मिसळचा आस्वाद घेतो.

कोथिंबीर वडी :

कोथिंबीर वडी महाराष्ट्रातील बहुतेक घरांमध्ये आवर्जून बनवण्याय येते आणि ती अनेकांच्या आवडची देखील आहे. या वड्या अतिशय कुरकुरीत आणि चवीला चटपटीत असतात.

पुरणपोळ्या :

पुरणपोळ्या हे महाराष्ट्राचे पारंपारिक खाद्यपदार्थ आहे, अनेक सण-समारंभ, शुभप्रसंगी घराघरात पुरणपोळ्या बनवल्या जातात. चण्याच्या डाळीचे गोड पुरण भरून बनवलेली ही पुरणपोळी सर्वांच्याच आवडीची आहे.

अळूवड्या :

अळूच्या पानांमध्ये चटपटीत सारण भरून तयार केलेल्या अळूवड्या कोणाला आवडत नाहीत? खरपूस तळलेल्या या वड्या आणि त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर हे एक वेगळंच समीकरण आहे नाही का.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT