उन्हाळा हा सुट्टीचा हंगाम असल्यामुळे अनेक लोक फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची योजना आखतात. परंतु, उन्हाळ्यातील प्रखर ऊन आणि उष्णतेमुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
उन्हाळ्यात फिरायला जाताना थंड हवेची ठिकाणे जसे की महाबळेश्वर, माथेरान, लडाख, शिमला, मनाली, औली यांसारखी ठिकाणे निवडावीत.
समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार असेल, तर सकाळी किंवा संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे अधिक चांगले ठरते.
उन्हाळ्यात प्रवास करताना हलक्या आणि आरामदायक सुती कपड्यांचा वापर करावा. गडद रंगाच्या कपड्यांपेक्षा फिकट रंगांचे कपडे अधिक योग्य ठरतात. टोपी, गॉगल आणि स्कार्फचा वापर केल्याने थेट उन्हापासून बचाव करता येतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक यांसारख्या सत्त्वयुक्त द्रवपदार्थांचा समावेश करावा. कॅफिनयुक्त किंवा अल्कोहोलयुक्त पेय टाळावीत.
प्रखर उन्हामुळे त्वचेस हानी पोहोचू शकते. त्यामुळे प्रवासाला निघण्याआधी SPF ३० किंवा त्याहून अधिक रेटिंग असलेला सनस्क्रीन वापरावा. आवश्यक असल्यास ३-४ तासांनी पुन्हा लावावा.
उन्हाळ्यात जड आणि तेलकट अन्न टाळावे. ताज्या फळांचा समावेश करावा. साळीच्या लाह्या, गोडांबा, थंड पेये यांचा आहारात समावेश करावा.
प्रवासाच्या आधीच तिकिटे आणि राहण्याची व्यवस्था करून ठेवावी. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी प्रवास करावा. दुपारच्या कडक उन्हात प्रवास टाळावा.
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रवासात ORS पावडर, ग्लुकोज, आवश्यक गोळ्या आणि मलम असलेली फर्स्ट एड किट सोबत ठेवावी.
उन्हाळ्यात प्रवास करताना योग्य काळजी घेतल्यास आपण आरोग्यदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घेऊ शकतो. वरील टिप्स लक्षात ठेवल्यास उष्णतेचा त्रास न होता आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.