Manish Jadhav
एकट्याने प्रवास करायची भीती वाटणे स्वाभाविक आहे, विशेषतः जर तुम्ही पहिल्यांदाच सोलो ट्रिप करत असाल. पण योग्य तयारी आणि मानसिकता असेल, तर तुम्ही आत्मविश्वासाने प्रवास करु शकता.
प्रवास करण्याआधी तुमच्या डेस्टिनेशनची माहिती घ्या. सुरक्षेच्या दृष्टीने कोणती ठिकाणे सुरक्षित आहेत, कोणत्या वेळेस बाहेर पडावे, हे जाणून घ्या.
महत्वाची कागदपत्रे (आधार कार्ड, पासपोर्ट) डिजिटल स्वरुपात सेव्ह ठेवा. टेल किंवा होस्टेल आधीच बुक करा आणि विश्वासार्ह ठिकाणीच थांबा. केशन शेअरिंग फीचरचा उपयोग करुन कुटुंब किंवा मित्रांना तुमची अपडेट्स द्या.
भीती कमी करण्यासाठी स्वतःशी ठामपणे बोला – "मी हे करु शकतो/शकते." गर्दीमध्ये कसं वागायचं, कोणाशी बोलायचं, यासाठी स्वतःला तयार करा.
प्रवासात नवीन लोक भेटतील, पण प्रत्येकावर पटकन विश्वास ठेवू नका. थोडसंही अस्वस्थ वाटलं तर त्या ठिकाणाहून लगेच निघा.
Google Maps, Translate, आणि Uber सारख्या अॅप्सचा उपयोग करा. हॉटेल आणि स्थानिक ट्रान्सपोर्टच्या माहितीचे स्क्रीनशॉट ठेवा.
एकट्याने प्रवास म्हणजे स्वतःला वेळ देणे. नवीन ठिकाणे, खाद्यपदार्थ, संस्कृती अनुभवण्याचा आनंद घ्या.