Periods Problem Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Period Cramps Tips: 'या' 4 पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी

काही 'स्लीपिंग पोझिशन्स' च्या मदतीने तुम्ही मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून सहज सुटका मिळवू शकता.

दैनिक गोमन्तक

Sleeping Positions For Period Cramps: मासिक पाळीच्या असह्य वेदनांचा सामना करणे हे प्रत्येक स्त्रियांसाठी एक मोठे काम असते. या त्रासामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

पीरियड्समध्ये पोट आणि पाय खुप दुखतात. काही स्त्रिया या वेदनापासून मुक्त होण्यासाठी हीटिंग पॅड आणि पीरियड पेनकिलर वापरतात. तसेच ,आणखी एक मार्ग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होऊ शकता. 

मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळणे काही वेळा कठीण असते हे मान्य आहे. परंतु जेव्हा तुम्हाला या समस्येला तोंड देण्याचे मार्ग चांगले माहीत असतात, तेव्हा या वेदनांवर मात करणे सोपे जाते. 

योग्य झोपल्यास तुम्ही या दुखण्यापासून सहज सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक, मासिक पाळीच्या वेदनांसाठी झोपेच्या काही पोझिशन्स देखील आहेत. ज्या तुम्हाला ही समस्या कमी करण्यात मदत करू शकतात. 

  • गुडघ्याखाली उशी ठेवा आणि पाठीवर झोपावे

जर तुम्ही गुडघ्याखाली उशी ठेवून तुमच्या पाठीवर झोपत असाल तर मासिक पाळीच्या तीव्र वेदना कमी होण्यास मदत होईल. झोपण्याच्या या स्थितीमुळे तुमच्या पाठीवर आणि पोटावरील ताण कमी होण्यास मदत होते.

  • तुमच्या बेडरूमचे वातावरण

झोपण्याच्या स्थितीत बदल करण्याव्यतिरिक्त, झोपताना तुमच्या बेडरूमचे वातावरण समायोजित करा. खोलीचे तापमान उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवा. खोलीतील वातावरण नियंत्रणात ठेवून पीरियड वेदना कमी करता येतात. तसेच, तुमचा पलंग आरामदायक ठेवा आणि खोलीत योग्य वायुवीजन ठेवा. 

Sleeping
  • पोटावर झोपवे

पोटावर झोपणे चांगले मानले जात नाही. जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान तुमच्या टोंगळ्याखाली उशी ठेवून पोटावर झोपत असाल तर ते मासिक क्रॅम्प आणि वेदना कमी करण्यास मदत करेल. 

  • डाव्या बाजूला झोपावे

डाव्या बाजूला झोपणे मासिक पाळीच्या वेदनांसाठी फायदेशीर ठरते. कारण यामुळे गर्भाशयात रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. त्याच वेळी, ते यकृतावरील दाब देखील प्रतिबंधित करते आणि ऍसिड रिफ्लक्स कमी करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

Goa Politics: खरी कुजबुज; अन्‍यथा विजय पत्रकार झाले असते!

Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! 'महादेवी' नांदणी मठात परतणार; मठ, वनतारा, शासन यांची एकत्रित याचिका

Goa Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करणं पडलं महागात, पाजीफोंड येथील 24 वर्षीय युवतीला 3.30 लाखांचा चुना; आरोपी गजाआड

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

SCROLL FOR NEXT