Pizza Health Risk: दर आठवड्यात पिझ्झा खाल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? वाचा सविस्तर

तुम्हालाही दर आठवड्यात पिझ्झा खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागु शकते.
Pizza
Pizza Dainik Gomantak
Published on
Updated on

Pizza Health Risk: पिझ्झा हा पदार्थ सर्वाच्या आवडीचा आहे. लहान ते मोठ्यांपर्यंत मोठ्या आवडीने पिझ्झा खातात. फास्ट फूड असूनही आजकाल पिझ्झाची मागणी वाढत आहे. प्रत्येक पार्टीत, प्रत्येक कौटुंबिक समारंभात याला पिझ्झा पाहायला मिळतो.

तरुणांनाच नाही तर काही वृद्धांनाही याचा आस्वाद घ्यायला आवडतो. पिझ्झा चवीने भरलेला आहे, पण जास्त पिझ्झा खाल्ल्याने तुमच्या शरीराला किती समस्यांना सामोरे जावे लागते हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया तुमची ही आवडती डिश खाल्ल्याने तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात.

  • पिझ्झा खाण्याचे तोटे

1. हृदयविकाराचा धोका

चीज आणि प्रक्रिया केलेले मांस टॉपिंग केल्यामुळे, पिझ्झामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे अचानक कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. पिझ्झाच्या तीन ते चार स्लाइस किंवा त्याहून अधिक स्लाईस नियमितपणे खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर वाइट परिणाम होऊ शकतो. 

2. वजन वाढणे

साध्या चीज पिझ्झाच्या एका स्लाइसमध्ये 400 कॅलरीज असतात. म्हणून पिझ्झाचे दोन किंवा तीन स्लाइस खाल्ल्याने तुमच्या शरीरातील 800 ते 1200 कॅलरीज वाढतील. एवढेच नाही तर त्यावर पेपरोनीसारखे प्रोसेस केलेले टॉपिंग टाकल्यावर कॅलरीजचे प्रमाण आणखी वाढेल. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. 

3. कॅन्सरचा धोका

पिझ्झावर टॉपिंग्जमध्ये बेकन, पेपरोनी आणि सॉसेज सारखे उच्च चरबी प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने तुम्हाला काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका असू शकतो, जसे की पोट आणि आतड्यांचा कर्करोग इ. 

Pizza
Pizza Dainik Gomantak
Pizza
Mono Diet: वाढलेले वजन कमी करण्यासाठी खरोखरच मोनो डाएट मदत करते? वाचा एका क्लिकवर
  • पिझ्झा खाण्याचा सुरक्षित मार्ग कोणता आहे?

पिझ्झा खाण्यावर नियंत्रण ठवणे गरजेचे असते. पिझ्झा मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. पिझ्झा रिफाइंड पिठाचा बनलेला आहे, ज्यामुळे तुमचे पचन मंदावते आणि तुमची चयापचय क्रिया मंदावते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com