Roti Vs Rice | Roti Or Rice Responsible for Weight Gain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Roti Vs Rice : चपाती की भात? काय खाल्ल्याने वाढतं वजन? इथे वाचा

लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की त्यांनी त्यांच्या आहारात काय समाविष्ट करावे

दैनिक गोमन्तक

भात आणि चपाती हे आपल्या अन्नातील महत्वाचे घटक आहेत. या दोन गोष्टी आपल्या ताटात वर्षानुवर्षे असतात. पण या दोन्हीबद्दल नेहमीच वाद होत आला आहे. भात खाल्ल्याने वजन वाढते असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांना बरेच लोक एकच सांगतात, भाताऐवजी चपाती खा. नाहीतर वजन आणखी वाढेल. पण अनेकांचे असे मत असते की चपातीने वजन वाढते. जाणून घ्या याबद्दल सर्व काही (Roti Or Rice Responsible for Weight Gain)

भात खाल्ल्याने वजन वाढते आणि चपाती खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. आता अशा परिस्थितीत ज्या लोकांना आपले वजन वाढवायचे आहे किंवा कमी करायचे आहे, ते आपला आहार सुधारण्याचा प्रयत्न करतात.

लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की त्यांनी त्यांच्या आहारात काय समाविष्ट करावे, चपाती किंवा भात? जे वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. याविषयी जाणून घेऊया.

वजन वाढवण्यासाठी कोणता पदार्थ चांगला आहे, चपाती की भात?

चपाती प्रत्येक घरात खाल्ली जाते. यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आणि फायबर असते. तुम्हा सर्वांना माहित आहे की, ज्या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते पोट लवकर भरतात आणि जास्त वेळ भूक लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.

म्हणूनच आहारतज्ञांच्या मते, चपातीमुळे वजन वाढणे परिणामकारक मानले जात नाही. कमी चपाती खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्याच वेळी आहारतज्ज्ञ असेही सांगतात की, भात आणि चपाती यांचे पौष्टिक मूल्य जवळपास सारखेच असते. भात खाल्ल्याने तुमचे वजन सहज वाढू शकते, तेही केवळ भात सहज पचण्यामुळे. शरीर तांदळातील पोषक घटक सहज शोषून घेते, आणि तुम्हाला पुन्हा भूक लागते.

या गोष्टी लक्षात ठेवा

वजन वाढवायचे असेल तर फक्त भात खाणे पुरेसे नाही. वजन वाढवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारात प्रथिने, कार्ब्स आणि हेल्दी फॅट घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे फक्त वजन कमी करण्यासाठी चपाती चालणार नाही. तुम्हाला चांगला व्यायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT