Goa Drugs Seizure: गोव्यात ड्रग्ज विकून 'लकी'झाला करोडपती; घर, कार खरेदी केल्याचं उघड

नायजेरियन नागरिकाला अटक: पोलिस कोठडीत रवानगी
Goa Drugs Seizure
Goa Drugs SeizureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Drugs Seizure अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने मोलेभाट - साळगाव येथे छापा टाकून नायजेरियन संडे ओने लकी (47) याला 64.91 ग्रॅम एलएसडी व 20.45 ग्रॅम एमडीएमए अमलीपदार्थ जप्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्सची किंमत सुमारे 66 लाख 95 हजार 500 रुपये आहे. गेल्या काही वर्षांपासून संशयित लकी हा गोव्यात असून त्याने ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायामधून सुमारे 97 लाखांची मालमत्ता खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Goa Drugs Seizure
Pre-Monsoon Work: अखेर मुरगाव प्रभाग 22 मधील मान्सूनपूर्व कामे पूर्ण; नगरसेवक सुदेश भोसले यांचा पुढाकार

गेल्या काही दिवसांपासून कक्षाच्या पोलिसांनी संशयित लकी याच्यावर पाळत ठेवली होती. त्याला काल रात्री तो राहत असलेल्या साळगाव येथील फ्लॅटमध्ये ताब्यात घेऊन घेतलेल्या या झडतीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडला. तो ड्रग्सची विक्री करत होता.

या ड्रग्स व्यवसायातून त्याने मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली असता त्याने फ्लॅटस्, दुकान व वाहन खरेदी केले आहे. त्याच्या बँकेच्या खात्यावरही काही प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे.

Goa Drugs Seizure
Film industry: यशस्वी अभिनेता बनण्यासाठी प्रयोग करत राहणे हाच फॉर्म्युला - रती

त्याची जंगम व स्थावर मालमतेची किंमत सुमारे 97 लाख रुपये असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्याने ही मालमत्ता बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे.

मालमत्तेच्या खेरदीप्रकरणी तो व्यवहार सादर करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या या मालमत्ता ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Fodder Production Plan
Courier Drug Smuggling
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Goa Crime Branch Drug Raid
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com