Recipe Dried Bangada Fresh Bangada Dainik Gomantak
लाइफस्टाइल

रेसिपी: सुका बांगडा, ताजा बांगडा

उत्तम ताजे बांगडे मिळायचा काळ कुठला तर तो श्रावण मास होय. त्यामुळे श्रावण पाळू शकणारा कोकणी गोवेकर माणूस श्रावण न पाळता बांगडे पाळतो.

दैनिक गोमन्तक

बांगडा ताजा असो की सुका, छानच लागतो. पावसाच्या दिवसात जेंव्हा आकाश तांबसे होते तेंव्हा समुद्रात बांगडुल्या ( छोटे बांगडे) पडतात, असे गोवा तळ कोकणातले लोक म्हणतात. उत्तम ताजे बांगडे मिळायचा काळ कुठला तर तो श्रावण मास होय. त्यामुळे श्रावण पाळू शकणारा कोकणी गोवेकर माणूस श्रावण न पाळता बांगडे पाळतो.

बांगडा छोटा असला तर अगदी चविष्ट, रसना तृप्त करणारा. र सुका बांगडा लाळरस उद्दीपीत करणारा. ताज्या बांगड्याचे हुमण तिरफळ, खोबरे, मिरची असे यथायोग्य संस्कार करून पानावर वाढूनन घ्यावे. वाहणाऱ्या हुमणाला भाताचा ढीग लावून अडवून घ्यावे आणि ताज्या पावाच्या तुकड्यात तो रस भिजवून जिभेवर सोडून द्यावा. आणि ''तिळा तिळा दार उघड '' म्हटल्यावर अलिबाबाची गुहा उघडावी तशी जिव्हा उघडी होऊन पूर्ण अर्ध्य उदरात सामावून घेते. सुक्या बांगड्याची आमटी सुद्धा करतात. पण ताज्या बांगड्याची आमटीची चव त्याला नाही. सुक्या बांगड्याची करावी तर ती किसमूर /कोशीम्बीर. सुका बांगडा चुलीवर भाजायला घेतला की त्या सुवासावर कोस कोस राहणारी मत्स्याहारी मंडळी भूक नसताना सुद्धा जेऊ लागतात, असे म्हणतात.

सुक्या बांगड्याची भाजून त्यावर मस्त खोबरेल तेल सोडावे आणि तो चुरून घ्यावा. मग मस्त कच्चा कांदा, लागल्यास टोमॅटो आणि कोथिम्बिर, लिंबू घ्यावे आणि कोशिंबीर नावाची जिव्हा लालसा तयार होते. अधिक लिहीत नाही, पण माझ्या आजीने सांगितलेली एक गोष्ट सांगतो. एक माळीण आणि एक कोळीण मैत्रीणी असतात. कोळीण एकदा माळीणीकडे जेवायला जाते. जेवण उत्तम असते पण कोळीणीला आवडत नाही. मोगरा, जाई च्या सुंदर वासात तिचा जीव गुदमरतो. रात्री ती कोळीण माळीणीला घरी बोलावते आणि सुके बांगडे भाजून वाढते. माळीण अगदी प्रसन्न होते. ताव मारून जेवते. कोळीणीला विचारते हा ( सुक्या बांगड्याचा) वास हा माझ्या मोगऱ्याच्या गजऱ्याच्या वासापेक्षा सुंदर आहे. गोष्टीत अतिशयोक्ती वाटते का? गोष्ट खोटी असेल कदाचित, पण बांगड्याची चव अस्सल व खरीखुरी आहे.

- केदार साखरदांडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT