बरेच लोक वर्षभर काही खास प्रसंगाचाी वाट बघत असतात. सणांसुदिला खास पदार्थांची मेजवानी करतात. आणि आजपासून तर नवरात्र लागले आहे आणि महिला वर्गाचे उपवासही सुरू झाले आहे. तेव्हा नवरात्रात उपवास करताना नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा येतो. तेव्हा आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय खास पनिर रोल रेसिपी. पनीर रोल रेसिपी (Paneer Roll) तुम्ही किट्टी पार्टीसाठी स्टार्टर किंवा स्नॅक म्हणूनही देऊ शकता. ही डिश पिकनिक आणि रोड ट्रिपसाठी देखील चांगली आहे. तुम्ही ही अप्रतिम डिश करून बघा आणि तुमच्या प्रियजनांसोबत त्याचा या मेजवानीचा आनंद घ्या.
पनीर रोल साहित्य
बटाटा - 2 कप
मनुका - 50 ग्रॅम
हिरवी मिरची - 4
तूप - 1.1/2 कप
पनीर - 2 कप
आवश्यकतेनुसार सेंध मीठ
जायफळ - 1 डॅश
वेलची पावडर 1 टी स्पून
कृती
स्टेप - 1 बटाटे उकळण्यासाठी ठेवा
हा स्वादिष्ट फराळ तयार करण्यासाठी आधी बटाटे उकळून घ्या. बटाटे शिजवल्यानंतर बाहेर काढून एका भांड्यात काढून घ्या.
स्टेप- 2 बटाटे आणि पनीर मसाल्यांमध्ये मिसळा
बटाट्यांसह पनीर आणि हिरव्या मिरच्या एका भांड्यात मिसळा. तयार मिश्रणात सेंध मीठ, मनुका, काळी मिरी, वेलची पूड आणि जायफळ घाला. सर्व साहित्य खूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.
स्टेप- 3 पीठ मळून घ्या आणि तयार करा
एकदा पुर्ण सामग्री चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर मिश्रणाचे पीठ मळून घ्या. आणि कणकेचे छोटे रोल बनवून ते तयार ठेवा.
स्टेप - 4 रोल्स तळून घ्या
शेवटी कढईत तूप घाला तुप गरम झाल्यानंतर रोल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत या डीश चा आस्वाद घ्या
पनिर आरोग्यासाठी फायदेशीर
पनीर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पनीरमध्ये पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी प्रकारचे पोषक घटक असतात. ते तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवतात. ते अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात. पनीरमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. चीजमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.