अनेक लोक बाहेर जातांना किंवा ऑफिसमध्ये जातांना, टिफिन पॅक करतांना तसेच पार्सल सेवेत अॅल्युमिनियम फॉइल (Aluminum Foil) किंवा फोइल (Aluminum Paper) पेपरचा वापर करतात. कारण यामध्ये अन्न ताजे राहते. पण यातील रसायने आपल्या आरोग्यास (Health) धोका निर्माण करू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? एका संशोधनानुसार,अॅल्युमिनियम फॉइलचा (Aluminum Foil) अतिवापर केल्यास आरोग्याला (Health) नुकसान पोहोचू शकते.
* ऑफिसमध्ये अॅल्युमिनियम फॉइलचा वापर
अनेक महिला आणि पुरुष ऑफिसमध्ये (Office) अन्न अॅल्युमिनियम फॉइलमध्ये (Aluminum Foil) घेवुन जातात. कारण यात अन्न गरम आणि ताजे राहते. पण याचा उलट परिणाम आपल्या शरीरावर होतो. यामुळे अॅल्युमिनियम फॉइल (Aluminum Foil) किंवा फॉइल पेपरचा अतिवापर टाळावा.
* बॅक्टेरियामध्ये वाढ
आरोग्य तज्ञांच्या मते, अन्न ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा (Aluminum Foil) वापर करता येतो . परंतु अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न (Food) अधिक काळ ठेवल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एका ठराविक काळानंतर अन्नतील पोषक घटक (Nutrients) कमी होऊन जातात. यामुळे शरीरास आवश्यक ते घटक अन्नामधून मिळत नाही. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास इतर आजार उद्भवू शकतात. गरम आणि ताजे अन्न सामान्य तापमानात अधिक वेळ राहिल्यास त्यात बॅक्टेरिया (Bacteria) जमा होऊ लागतात. तसेच अॅल्युमिनियम फॉइलमध्ये (Aluminums Foil) अन्न ठेवल्यास बॅक्टेरिया (Bacteria) वाढण्याचा धोका निर्माण होतो.
* पुढील गोष्टींची काळजी घ्यावी
अन्न नेहमी हवा बंद डब्ब्यात ठेवावे.
स्वयंपाक झाल्यानंतर अन्न जास्त वेळ ठेवू नये. जास्तीत जास्त 3 ते 4 तासात अन्न संपवावे.
दुधापासून बनलेले पदार्थ आणि मांसाहार पदार्थांमध्ये बॅक्टेरिया (Bacteria) वेगाने वाढण्याची शक्यता असते.
जर तुम्ही 3 तासापेक्षा अधिक काळ उलटून गेलेले अन्न खात असला तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तसेच अनेक लोक गरम अन्न अॅल्युमिनियम फॉइल (Aluminum Foil) किंवा अॅल्युमिनियम पेपरमध्ये (Aluminum Paper) ठेवतात. पण यातील अन्न खाल्यास अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.