Sugar free Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Sugar Free Diet: महिनाभर साखरेचे पदार्थ खाल्लेच नाहीत तर काय होईल?

Sugar Free Diet For One month: त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होतेच, पण हिरड्यांमध्येही समस्या निर्माण होतात.

दैनिक गोमन्तक

Benefits Sugar Free Diet For One month: गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. थोडे गोड अथवा साखर आपल्या शरीरासाठी उपयोगी असली तरीही त्याचे प्रमाण जास्त झाले तर शरीरासाठी धोकादायक ठरु शकते.

मात्र साखरेचे पदार्थ नाही खाल्ले तर शरीरात काही चांगले बदल घडून येऊ शकतात. हे सकारात्मक बदल कोणते हे जाणून घेऊयात.

1. वजन कमी होते

आपल्या सर्वांना माहिती आहे की जास्त साखर खाल्ल्याने तुमचे वजन लवकर वाढते.

त्यामुळे जेव्हा तुम्ही साखरेचे सेवन पूर्णपणे बंद करता तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या चरबीवर होतो आणि तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

2. मधुमेह नियंत्रण

साखर ही मधुमेही रुग्णांसाठी 'विषारी' असते, परंतु ज्यांना हा आजार नाही त्यांच्यासाठीही मधुमेहाचा धोका आणि रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते.

त्यामुळे गोड पदार्थाचे प्रमाणात सेवन करणे महत्वाचे ठरते.

3. दातांचे आरोग्य

साखर देखील आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली नसते, त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होतेच, पण हिरड्यांमध्येही समस्या निर्माण होतात.

त्यामुळे आपले दात चांगले ठेवण्यासाठी साखर किंवा साखरेचे पदार्थ न खाणे चांगले मानले जाते.

4. अतिरिक्त ऊर्जा

साखर खाल्ल्याने अतिरिक्त ऊर्जा मिळते यात शंका नाही, परंतु जास्त ऊर्जा वापरल्याने ऊर्जा इतक्या वेगाने कमी होऊ शकते.

साखर सोडल्याने ऊर्जा पातळी सुधारू शकते.

5. त्वचेवर चमक येते

आपण काय खातो-पितो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तसाच त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. साखरेचे पदार्थ खाण्याचे प्रमाण केले तर आपल्या त्वचेवर चमक येते.

एक महिना पांढरी साखर सोडल्याने शरीरात सकारात्मक बदल होऊ शकतात. निरोगी जीवनशैली( Lifestyle) आणि संतुलित आहाराने हा बदल दीर्घकाळ टिकवून ठेवता येतो.

जर तुम्हाला तुमचे शारीरिक आरोग्य सुधारायचे असेल तर पांढर्‍या साखरेचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तसेच, दैनंदिन शारीरिक हालचालींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

साखर आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी ही अनेकांची कमजोरी असते, अनेकांना इच्छा असूनही मिठाई, आईस्क्रीम, पेस्ट्री केकचा मोह सोडता येत नाही, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

पांढऱ्या साखरेचे सेवन बंद केले तर शरीरावर विशेषत: त्वचेवर बदल दिसून येतात. पांढऱ्या साखरेचे अतिसेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

महिनाभर पांढरी साखर आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू खाणे बंद केले तर आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT